आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 दिवसांच्या कोठडीची‎ मागणी:रोझरी शिक्षण संस्थेचे‎ अऱ्हाना ईडीकडून अटकेत‎

पुणे‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीने पुण्यातील कॅम्प परिसरात‎ असलेल्या रोझरी शिक्षण संस्थेचे‎ संचालक विनय अऱ्हाना यांना ४६ कोटी‎ रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर‎ शनिवारी अटक केली आहे.‎ न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने‎ आऱ्हानाच्या १४ दिवसांच्या कोठडीची‎ मागणी केली होती. न्यायालयाने त्यांना‎ २० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत‎ ठेवण्याचे आदेश दिले आहेत.‎ ई डीने‎ विनय विवेक आऱ्हाना यांना सत्र‎ न्यायाधीश मुंबई न्यायालय येथे शनिवारी‎ हजर केले. त्यानंतर न्यायालयाने‎ आरोपीस २० मार्च पर्यंत इडीकडे‎ कोठडी मंजूर केली आहे. आत्तापर्यंत‎ अनेकवेळा त्यांची ईडी कडून चौकशी‎ करण्यात आली होती. अखेर शनिवारी‎ त्यांना अटक करण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...