आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजंगली हत्ती अन्नाच्या शोधात भरकटतात आणि बऱ्याचदा मानवी वसाहतीमध्ये घुसतात. मात्र, केवळच्या इडुक्की जिल्ह्यातील एक जंगली हत्ती “अरिकोम्बन’ची दहशत एवढी माजली की, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक रहिवाशांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. नुकतेच न्यायालयाने अरिकोम्बनवर कारवाई करण्यासाठी पाच सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. समिती ५ एप्रिलला न्यायालयाला आपला अहवाल सादर करेल. तोवर हत्तीला पकडण्यावर स्थगिती घातली आहे. कोर्टाच्या निर्णयावर नाराज १२ ग्राम पंचायतींनी यामुळे संप केला.
तांदळाची आवड असणाऱ्या अरिकोम्बनच्या पारंपरिक मार्गावर सरकारने रेशन दुकान सुरू केले आहे. अशात हत्ती रेशन दुकानात घुसून सर्व दांतूळ फस्त करत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हत्तीला येथून हुसकावून अन्यत्र नेण्यात यावे. यामुळे मुले शाळेत जायला घाबरत आहेत. अनेक हत्ती बसवरही हल्ला करतात. काही लोकांनी सांगितले की,‘अरिकोम्बन’ शिवाय अन्य काही हत्तीही आमच्यासाठी धोका ठरले आहेत. या सर्व हत्तींना हलवले जावे.
केरळचे वनमंत्री एके ससींद्रन म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाने प्रकरण गुंतागुंतीचे केले आहे. सरकार कायद्याअंतर्गत पाऊल उचलेल. असे असले तरी तांदळाची त्यांची आवड वगळता त्यांच्याविरोधातील अन्य आरोप सध्या सिद्ध झालेले नाहीत. तामिळनाडूच्या मथिकेतन शोलापर्यंत विस्तारलेल्या हत्ती प्रवासी मार्गात अनयिरंकल वसाहत आहे. हा अरिकोम्बनचा अधिवास आहे.
लोकांनी तांदळामुळे अरिकोम्बन नाव ठेवले स्थानिकांत हत्ती अरिकोम्बन नावाने कुख्यात आहे. “अरि’ याचा अर्थ होतो, तांदूळ आणि “कोम्बन’चा अर्थ होतो हत्ती. त्यामुळे तांदळाची आवड असणाऱ्या या हत्तीचे नाव अरिकोम्बन पडले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.