आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमधील निवडणुका झाल्यानंतरही हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर बुधवारी सकाळी 6.30 वाजता क्रूड बॉम्बने हल्ला करण्यात आला.
सांगितले जात आहे की, बॉम्ब फेकणारे 3 आरोपी दुचाकीवर आले होते. अर्जुन बंगालमधील बॅरकपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. राज्यपाल जगदीप धनखार यांनी बॉम्बस्फोटाच्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा घटनांमुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतात.
बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी या घटनेसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. घटनेनंतर आलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या घटनेनंतर खासदारांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
बंगालच्या निवडणुकीनंतरही हिंसाचार
बंगालमधील निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर झाले. यानंतर राज्यात हिंसाचाराची अनेक प्रकरणे समोर आली. यामध्ये सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची (एनएचआरसी) एक टीम हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी बंगालमध्ये गेली आणि कलकत्ता उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. आयोगाने हिंसाचाराबाबत न्यायालयाला सांगितले होते की बंगालमध्ये कायद्याचे राज्य नाही, तर शासकांचे नियम चालतात. बंगाल हिंसाचाराच्या प्रकरणांची राज्याबाहेर चौकशी व्हायला हवी.
ममतांनी अहवाल लीक झाल्यानंतर घेतला होता आक्षेप
13 जुलै रोजी निवडणुकांनंतर बंगालमधील हिंसाचार न्यायालयात सादर करण्यात आला. काही वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांवर अहवाल उघड झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आयोगाने न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे आणि हा अहवाल लीक होऊ नये असे ममता यांनी म्हटले होते. हा अहवाल फक्त न्यायालयापुढे ठेवला गेला पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.