आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टर अपघात:अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे 'चिता' हेलिकॉप्टर क्रॅश, वैमानिकाचा मृत्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय वायू दलाच्या चिता हेलिकॉप्टरचा बुधवारी अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेची माहिती दिली.

माहितीनुसार, बुधावारी दुपारी झालेल्या या अपघातामध्ये कर्नल सौरभ यादव हे गंभीर जखमी झाले होते. यानंतर ताबडतोप त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेलिकॉप्टरचा न्यामजंग चू या भागात अपघात झाला. पाचव्या इन्फ्रेंट्री डिव्हिजन ऑफिसर कमांडिग यांना सोडून चिता हेलिकॉप्टर हे सुरवा चांबातून परतत होते. दरम्यान, विमानाचा अपघात का झाला, याचे कारण कळू शकलेले नाही. तर दुसरीकडे अपघातच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...