आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नेपाळ आणि चीनसोबत सीमेवर भारताचा वाद सुरू असतानाच लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी सर्व काही व्यवस्थित असल्याचा दावा केला आहे. लष्करप्रमुखांनी शनिवारी सांगितल्याप्रमाणे, मी सर्वांना खात्रीने सांगू इच्छितो की चीनसोबत असलेल्या भारतीय सीमांवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही सातत्याने कमांडर लेव्हल आणि समकक्ष अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहोत. डेहराडून येथे शनिवारी इंडिया मिलिट्री अकॅडमीच्या पासिंग आउट परेडमध्ये ते बोलत होते. नेपाळ आणि भारत भौगोलिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने एकमेकांशी जुळलेले आहेत. भारताचे नेपाळसोबत संबंध मजबूत असून पुढे देखील बळकट होत राहतील असा दावा लष्करप्रमुखांनी केला आहे.
महिनाभरापासून भारत चीन सीमेवर तणाव
लडाखसह सिक्कीममध्ये भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गेल्या महिनाभरापासून वाद सुरू आहे. हा वाद मिटवण्यासाठी कमांडर स्तरीय चर्चा केल्या जात आहेत. तरीही हा तणाव काही कमी झालेला नाही. चीनने बुधवारीच म्हटले होते, की दोन्ही देशांच्या सैनिकांनी मागे येण्यास तयारी दर्शवली आहे. तर भारताने चीनसोबतचा वाद सीमेवरून 10 हजार सैनिक हटणार नाही तोपर्यंत मिटणार नाही असे स्पष्ट केले होते. तत्पूर्वी सिक्किममध्ये सुद्धा दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले होते.
नेपाळ पोलिसांच्या फायरिंगमध्ये एका भारतीयाचा मृत्यू
भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असतानाच भारताचा नेपाळसोबतचा तणाव देखील समोर आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 मे रोजी लिपूलेख पासून धारचूला पर्यंत बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन केले. यानंतर नेपाळमधून त्याला मोठा विरोध झाला. या घटनेच्या 10 दिवसांनंतर 18 मे रोजी नेपाळने एक नकाशा जारी केला. त्यामध्ये भारताचा भाग असलेले लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी नेपाळचा घटक दाखवण्यात आले. यासोबतच शुक्रवारी नेपाळ आणि भारत सीमेवरून नेपाळ पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये बिहारच्या जानकीनगर सीमेजवळ एका युवकाचा मृत्यू झाला. तसेच तीन जण जखमी झाले. या ठिकाणी भारताचे एसएसबी जवान तैनात आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.