आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Army Chief MM Naravane Ladakh Update | Army Chief General Manoj Mukund Naravane In Leh Ladakh Amid India China Border Tension

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्मी चीफचा लेह दौरा:एलएसीवर तणावपूर्ण परिस्थिती, आपले जवान आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार, चीनसोबतच्या वादावर जनरल नरवणे यांनी केले भाष्य

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने गेल्या सहा दिवसांमध्ये दोन वेळा लडाखच्या पँगॉन्ग परिसरात घुसखोरी करण्याता प्रयत्न केला होता
  • भारतीय सैन्याने चीनच्या प्रयत्नांना हाणून पाडले, वादग्रस्त परिसरात दबदबा निर्माण केला

लडाखमध्ये चीनकडून आलेल्या ताणतणावाच्या दरम्यान लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे सलग दुसर्‍या दिवशी लेह दौर्‍यावर आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती (एलएसी) थोडीशी तणावपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणूनच आम्ही आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सैन्य तैनात केले आहेत. आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च आहे, ते प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यास तयार आहेत.

आपले जवान जगात सर्वात चांगले
आर्मी चीफ म्हणाले की - 'मी अनेक भागांचा दौरा केला आहे. अधिकाऱ्यांसोबत बोलून तयारीचा आढावाही घेतला आहे. मी पुन्हा म्हणले की, आपले अधिकारी आणि जवान जगात सर्वोत्कृष्ट आहेत. ते केवळ आर्मीचा नाही तर देशाचा गौरव वाढवतील.'

चर्चेने वाद सोडवण्यावर विश्वास
जनरल नरवणे यांनी सांगितले की, गेल्या 2-3 महिन्यांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे, मात्र आम्ही चीनसोबत मिलिट्री आणि डिप्लोमेटिक लेव्हललवर सातत्याने चर्चा करत आहोत. ही प्रोसेस पुढेही सुरू राहिल. आम्हाला विश्वास आहे की, चर्चेने वाद सोडवला जाईल. एलएसीवर सद्यस्थिती कायम राहावी यासाठी प्रयत्न केले जातील.

29-30 ऑगस्ट रोजी रात्री चीनने पँगॉन्ग परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला
चीनने पँगॉन्ग लेकच्या दक्षिणेकडील टेकडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने त्यांचा डाव उधळूनलावला. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी, चीनने चिथावणीखोर वागणूक दिली आणि 1 सप्टेंबर रोजी पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी चीन अयशस्वी झाला. दरम्यान, भारतीय लष्कराने वादग्रस्त भागावर कब्जा करून आपली ओळख निर्माण केली.