आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Army Chief MM Naravane Leh Visit Today To Review Progress In Talks With Chinese Military India China News And Updates

चीन नरमला:भारत-चीन सीमेवर शांतता लागू करण्यास दोन्ही देशांची सहमती, पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेणार चीन; लष्करप्रमुख नरवणे लेहमध्ये

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 तास चालली भारत आणि चीनच्या लेफ्टनेंट जनरल स्तराची बैठक
Advertisement
Advertisement

गलवान हिंसाचाराच्या 7 दिवसांनंतर भारताच्या दबावापुढे अखेर चीनने नरमाईची भूमिका घेतली आहे. चीन सीमेवरील मॉल्डो येथे दोन्ही देशांतील लष्कराच्या लेफ्टिनेंट जनरल स्तरावर चर्चा झाली. यामध्ये लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैनिकांनी पूर्व लडाखमध्ये तणाव कमी करण्याच्या हेतूने वादग्रस्त जागेवरून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान, मंगळवारी लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे लेह दौऱ्यासाठी निघाले. या ठिकाणी लष्कराच्या 14 बटालियनसोबत ते चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी सोमवारी जनरल नरवणे यांनी दिल्लीत लष्करी कमांडर्सची बैठक घेतली. त्यामध्ये लडाख, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड इत्यादी सीमा भागांवर होणाऱ्या वादांची माहिती घेण्यात आली.

भारत-चीनमध्ये दुसरी बैठक 11 तास चालली

गलवान खोऱ्यात 15 जूनला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर सोमवारी मॉल्डो येथे दोन्ही देशांच्या लेफ्टनेंट जनरल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा 11 तास सुरू होती अशी माहिती समोर आली आहे. यात भारताकडून 14 व्या कोअरचे कमांडर लेफ्टनेंट जनरल हरिंदर सिंह सहभागी झाले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत भारताने पूर्व लडाखच्या पँगोंग त्सो परिसरातून चिनी सैनिकांना माघारी घेण्याची मागणी केली. भारतीय लष्कराने गलवान येथे झालेल्या हिंसाचाराला चीनचा पूर्वनियोजित कट म्हटले होते. एप्रिलमध्ये लडाखची जी स्थिती होती तीच कायम करण्यात यावी अशी मागणी सुद्धा भारताने केली आहे.

कमांडिंग ऑफिसर मारला गेल्याची चीनची कबुली

दरम्यान, प्रथमच चीनने 15 जून रोजी झालेल्या हिंसाचारात आपला एक कमांडिंग ऑफिसर मारला गेल्याची कबुली दिली आहे. या अधिकाऱ्यासह आपले 2 सैनिक मारले गेले असेही चीनने म्हटले आहे. भारतीय माध्यमांवर त्या हिंसाचारात चीनचे 40 सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. याच हिंसाचारात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. या हिंसाचारात चीनच्या सैनिकांनी खिळे वेल्डिंग केलेल्या रॉडने भारतीय सैनिकांवर प्रहार केले होते.

Advertisement
0