आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये एन्काउंटर:पुलवामामध्ये सुरक्षादलाने 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा, चकमकीत सैन्याचा एक जवानही शहीद

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमकीला सुरुवात झाली.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरचे IGP (पोलिस महानिरीक्षक) विजय कुमार म्हणाले की, सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दोन जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी एक लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर निशज लोणे आणि दुसरा पाकिस्तानी अतिरेकी आहे.

चकमकीत सैन्याचा एक जवानही शहीद झाला आहे. राजपोरा भागातील हंजिन या गावात दहशतवाद्यांच्या लपण्याच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमकीला सुरुवात झाली.

सुरक्षा दलाने 2 दिवसांपूर्वी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे बुधवारी चकमक झाली. कारवाई दरम्यान कुलगामच्या चिमर भागात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.

27 जून रोजी दहशतवाद्यांनी SPO ला गोळ्या झाडल्या होत्या
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी रात्री दहशतवाद्यांनी गोळीबार करून विशेष पोलिस अधिकारी (SPO) फयाज अहमद भट आणि त्यांची पत्नी यांना ठार मारले. या हल्ल्यात जखमी झालेली त्यांची 21 वर्षीय मुलगी रफीया हिने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास दम तोडला.

बातम्या आणखी आहेत...