आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Army Northern Front Chief Dwivedi Said, Army Is Ready To Take PoK, Just Waiting For Order

सैन्याच्या उत्तर आघाडीचे प्रमुख द्विवेदी म्हणाले:पीओके घेण्यासाठी लष्कर सज्ज, केंद्र सरकारच्या आदेशाचीच प्रतीक्षा

श्रीनगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर पीओकेवर कारवाई केली जाईल. त्यासाठी लष्कर सज्ज आहे, असे लष्कराच्या उत्तर आघाडीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे. पीओकेबाबत संसदेत प्रस्ताव पारित झाला आहे. सरकारच्या कोणत्याही आदेशाचे पालन करण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे. आदेश मिळताच सैन्य आपल्या संपूर्ण तयारीने आगेकूच करेल. द्विवेदी म्हणाले, १९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानने पीओकेवर अतिक्रमण केले. पंतप्रधान नेहरू यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला. संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करून युद्धबंदीची सूचना केली. त्यामुळे हा भाग पाककडे तसाच राहिला.

३५ टक्के दहशतवादी २० वर्षांहून कमी वयाचे द्विवेदी म्हणाले, ३५ % दहशतवादी २० वर्षांहून कमी वयाचे आहेत. ५५ टक्के २०-३० वयात दहशतवादी होत आहेत. म्हणूनच तरूणांनी शिक्षण घेण्याची गरज आहे. त्यांचे चांगले पालनपोषण व्हावे यासाठी लष्करही प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...