आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांना फटकारले:लष्कराचे काम देशाचे रक्षण करणे, अराजकता पसरवणे नाही : सीजेआय

पवन कुमार | नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने सिकंदराबादेत कार्यरत एक मेजर जनरल आणि लष्कराच्या संरक्षण संपदा अधिकाऱ्यास फटकारले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे पीठ गुरुवारी म्हणाले, ‘लष्कराचे काम देशाचे रक्षण करणे आहे, लोकांवर हल्ला करणे नाही. लष्कर देशात बुलडोझर इत्यादींचा वापर करत अराजकता पसरवण्यासाठी नाही. आम्ही हायकोर्ट आणि खालच्या कोर्टाच्या आदेशाने पूर्णपणे समाधानी नाही. तुम्हाला तुरुंगात जावेच लागेल.’ यासोबतच कोर्टाने या अधिकाऱ्यांची याचिका फेटाळली आहे. तथापि, जोपर्यंत हायकोर्टात प्रकरण प्रलंबित आहे तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असा दिलासाही दिला.

दोन्ही अधिकाऱ्यांनी मालमत्ता वादात तोडफोडप्रकरणी हायकोर्टकडून सुनावण्यात आलेली २ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली होती. त्यांच्याकडून केंद्र सरकारने युक्तिवाद केला की, हे सर्वकाही नकळत झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...