आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Arnab Goswami Paid Lakhs Of Rupees To Ex BARC CEO To Boost TRP, Saya Mumbai Police In Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TRP घोटाळ्यात पोलिसांचा दावा:अर्णब गोस्वामीने 2 चॅलनची रेटिंग वाढवण्यासाठी BARC च्या माजी CEO ला दिले लाखो रुपये; TRP घोटाळ्यात आता अर्णबचेही नाव

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दासगुप्ता यांची कोठडी 30 डिसेंबरपर्यंत वाढली

टिलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) घोटाळ्यामध्ये मुंबई पोलिसांनी सोमवारी मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टमध्ये मोठा दावा केला आहे. पोलिसांनी म्हटले, 'रिपब्लिक TV चे एडिचर-इन-चीफ अर्णब गोस्वामीने आपल्या दोन चॅनलची रेटिंग वाढवण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (BARC)चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपये दिले होते'

TRP घोटाळ्यामध्ये पोलिसांनी पहिल्यांदा स्पष्टपणे अर्णबचे नाव घेतले आहे. यापूर्वी आरोपींच्या लिस्टमध्ये रिपब्लिकच्या मालकाचे नाव होते. अर्णबचे नाव नव्हते.

दासगुप्ता यांची कोठडी 30 डिसेंबरपर्यंत वाढली
पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड अहवालानुसार दासगुप्त जेव्हा बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते तेव्हा अर्णब आणि इतर आरोपींनी रिपब्लिक इंडिया आणि रिपब्लिक टीव्हीचा बेकायदेशीरपणे टीआरपी वाढवण्याचा कट रचला होता. यासाठी अर्णबने अनेक वेळा दासगुप्ताला लाखो रुपये दिले. असा दावा न्यायालयात करत पोलिसांनी दासगुप्ताचा रिमांड मागितला. कोर्टाने 30 डिसेंबरपर्यंत रिमांड वाढविले आहे.

दासगुप्ताने अर्णबच्या पैशातून लक्झरी वस्तू खरेदी केल्या
अहवालानुसार, दासगुप्ताने अर्णब कडून मिळालेल्या पैशातून दागिने व इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या, हे त्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. यात सुमारे 1 लाख रुपये किमतीचे टॅग हायरचे घड्याळ, 2.22 लाख रुपयांची इमिटेशन ज्वेलरी आणि स्टोन्सचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात दासगुप्ताला अटक करण्यात आली होती. टीआरपी घोटाळ्यात ही 15 वी अटक होती.

बातम्या आणखी आहेत...