आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Arnab Goswami Republic TV Vs Mumbai Police | FIR Against Editorial Team At NM Nagar Police Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिपब्लिकवर केस:मुंबई पोलिसात 'विद्रोह'ची बातमी चालवल्यानंतर दाखल केलेल्या  FIR वर रिपब्लिक टीव्हीवच्या स्टाफची चौकशी सुरू, सपोर्ट करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला अर्णब गोस्वामी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिपब्लिक टीव्हीवच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, 'कमिश्नर परमबीर सिंह यांच्या निर्णयाने मुंबई पोलिसांच्या जवानांमध्ये विद्रोहची स्थिती आहे'
  • FIR मध्ये डिप्टी न्यू एडिटर सागरिका मित्रा, अँकर शिवानी गुप्ता, डिप्टी एडिटर स्वान सेन आणि एग्जीक्यूटिव्ह एडिटर नारायण स्वामींच्या नावाचा समावेश आहे

एनएम जोशी नगर पोलिस स्टेशनमध्ये रिपब्लिक टीव्ही वाहिनीच्या एडिटोरियल टीमच्या चार जणांविरोधात मुंबई पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला होता. रिपब्लिकचे उपसंपादक शवन सेन आज चौकशीसाठी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्याची चौकशी केली जात आहे. तीन वाजता वाहिनीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी यांनाही पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. शवन सेन यांच्यासमवेत रिपब्लिक समूहाचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी देखील पोलिस स्टेशच्या बाहेरपर्यंत आला होता.

रिपब्लिक टीव्हीवर 'विद्रोह' बातमी प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. पोलिसांनी या चार जणांव्यतिरिक्त न्यूज पॅकेज संबंधीत इतर स्टाफलाही आरोपी बनवले होते. या प्रकरणी रिपब्लिकचे डिप्टी एडिटर शवन सेन, चॅनलचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी, डिप्टी न्यूज एडिटर नागरिका मित्रा आणि अँकर शिवानी गुप्ता यांच्यावर केस दाखल झाली होती. उप निरीक्षक शशिकांत पवार यांच्या तक्रारीवर पोलिसांमध्ये असंतोष उत्पन्न करणे आणि मानहानीचा केस दाखल करण्यात आली होती.

रिपब्लिकवर आहेत हे आरोप
एफआईआरमध्ये म्हटले आहे की, आरोपींनी गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता पोलिस अधिकाऱ्यांद्वारे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात 'विद्रोह' विषयी एक वृत्त प्रसारित केले होते. तक्रारित म्हटले आहे ककी, हे पोलिस दलाच्या सदस्यांमध्ये असंतोष निर्माण करणे आणि पोलिसांच्या मानहानीसारखेच आहे.

अर्णब गोस्वामीचे एफआयआरवर भाष्य
याप्रकरणी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचा एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामीने म्हटले की, '1000 FIR तर खूप कमी आहे, तुम्ही एक कोटी FIR दाखल कला. आम्ही उत्तर देऊ. कारण आम्ही घाबरणाऱ्यातलो नाही. आम्ही सत्यासाठी लढणारे लोक आहोत.'