आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:आरोग्य सेतूपासून धोका : हॅकर; तर सरकारचा दावा अॅप सुरक्षित

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनापासून बचाव करणाऱ्या अॅपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

कोराेनापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेले मोबाइल अॅप आरोग्य सेतूच्या सुरक्षेवर फ्रान्सिसी हॅकर इलियट अॅल्डरसन (टोपण नाव) याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अॅल्डरसने टिवटरवर केलेल्या दाव्यात म्हटले, हे अॅप डाऊनलोड करणाऱ्या ९ कोटी भारतीय जनतेचे खासगी माहिती भंग होण्याचा धोका आहे. हॅकरनंतर काँग्रेसने बुधवारी या अॅपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर सरकारने हे दावे फेटाळून लावले. कोणत्याही वापरकर्त्याची खासगी माहिती लीक झालेली आहे, हे हॅकर्संनी सांगितलेले नाही. आम्ही सतत सिस्टिम अपग्रेड करत असतो. कोणाचीही खासगी माहिती उघड होणार नाही, असे आरोग्यसेतू अॅपच्या टीमने म्हटले. तर केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर यांनी मोबाइल अॅपचा गोपनीय डाटा सुरक्षित आहे. काेरोनाच्या लढ्यात मदतीसाठी हे एक जबाबदार साधन असल्याचा दावा केला आहे.

हॅकरचा दावा- अॅपच्या त्रुटी उघड करणार

आधारच्या अॅपमध्ये येणाऱ्या अडचणींवर खुलासा करणारी हीच ती हॅकर व्यक्ती आहे. हॅकरने सांगितले, आधार डेटा थर्ड पार्टी वेबसाइट अॅक्सेस करते. आता त्यांनी अॅपमधील त्रुटी उघड करण्याचा दावा करत मंगळवारपासून बुधवारपर्यंत सलग टि्वट केले. यात त्याने अॅपच्या धोक्याची माहिती दिली.

- हॅकर इलियट अॅल्डरसन याने म्हटले, ५ एप्रिल रोजी आरोग्य सेतूला टॅग करून लिहिले, अॅपमध्ये सुरक्षेची अडचण असून ९ कोटी लोकांचा डाटा धोक्यात आहे.

- अँडरसनने या टि्वटमध्ये म्हटले, राहुल गांधी यांचे अॅपबाबतचे मत योग्य होते.

- अॅपच्या या अडचणीमुळे पीएम कार्यालय, संसद, लष्कर मुख्यालय व गृह मंत्रालयाच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी आजारी आहेत, असा अँडरसनचा दावा आहे.

- एका अन्य टिवटमध्ये हॅकरने दावा केला की, आरोग्य सेतू अॅप सुरक्षेच्या अडचणी सांगण्यासाठी ४९ मिनिटांनंतर त्याच्याकडे कॉम्प्यूटर आपात रिस्पॉन्स टीम(सीईआरटी) व नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) संपर्क साधला होता.

- एका डेडलाइनमध्ये अडचण सोडवली नाही तर अॅपची त्रुटी सर्वांसमोर उघड करू.

- अँडरसनने असेही म्हटले, आरोग्य सेतू अॅपचा साेर्स कोड, आेपन सोर्स असायला हवा. जर तुम्ही लोकांना अॅप इन्स्टाॅल करण्यास सांगत आहात तर अॅपची कार्यपद्धती कशी हे जाणून घेण्याचा त्यांना हक्क आहे.

- मला माझ्या मर्जीनुसार लोकेशन व अंतर निवडण्याचे स्वातंत्र्य हवे. अॅपमध्ये त्रिज्येचे मापदंड ठरलेले आहेत. उदा. ५०० मीटर, एक किमी, दोन किमी इत्यादी. हा गोपनीयतेचा भाग आहे.

- तत्पूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी आरोग्य सेतू अॅप अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेले निगराणी अॅप असल्याचा आरोप केला होता. यामुळे गोपनीयता व डाटाची सुरक्षितता यावर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे, असे त्यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...