आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याप्रकरणी अर्पिता मुखर्जींच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी बेलघरियातील त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापा टाकला. 18 तास चाललेल्या छाप्यात EDला 29 कोटींची रोकड मिळाली आहे. नोटा मोजण्यासाठी तीन मशीन लावण्यात आल्या होत्या. यासोबतच 5 किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे.
23 जुलै रोजीही EDने मंत्री पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. अर्पिताच्या घरातून 21 कोटी रुपये रोख आणि 1 कोटी रुपयांचे दागिने सापडले आहेत. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची अनेक बंडले एका खोलीत पिशव्या आणि बॅगमध्ये ठासून भरलेली होती. एजन्सीला कागदपत्रेही मिळाली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
अर्पिता यांनी नाही भरला फ्लॅटचा मेंटेनन्स चार्ज
अर्पिता यांच्या दोन्ही घरांतून आतापर्यंत 50 कोटींहून अधिक रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे. अर्पिता यांच्या बेलघरिया टाऊन क्लबमधील दोन फ्लॅटपैकी एक फ्लॅट EDने सील केला आहे. नोटीसमध्ये अर्पिता यांना 11,819 रुपये मेंटेनन्स न भरल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यांच्या फ्लॅटबाहेर नोटीस लावून ही माहिती देण्यात आली आहे.
अर्पिता यांच्या नातेवाईकांवरही छापे
EDने बुधवारी पुन्हा मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले. रिपोर्ट्सनुसार, EDने पार्थ आणि अर्पिता यांच्या 5 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. EDच्या पथकाने कोलकाता आणि आसपासच्या पाच ठिकाणी, अर्पितांचे कार्यालय, नातेवाईकांची घरे आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बेलघरिया आणि राजदंगा येथील इतर फ्लॅटवर छापे टाकले.
पार्थ चॅटर्जी म्हणाले - मी राजीनामा का देऊ?
बुधवारी, न्यायालयाच्या आदेशानुसार, 48 तासांनंतर पार्थ आणि अर्पितांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दोन तासांच्या तपासणीनंतर ते बाहेर आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत वारंवार विचारले. यावर पार्थ म्हणाले, मी राजीनामा का द्यायचा याचे कारण सांगा.
पार्थ यांच्या राजीनाम्यावर कॅबिनेट घेणार निर्णय
पार्थ चॅटर्जी यांना अटक होऊन 5 दिवस झाले, पण पक्षात त्यांचे सरचिटणीस, उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि परिषद खाते, वाणिज्य मंत्रिपद कायम आहे. विरोधक पार्थला बडतर्फ करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, पार्थने मंत्र्यांना दिलेले वाहनही परत केले आहे. वृत्तानुसार, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये ममता पार्थशी संबंधित निर्णय घेऊ शकते
आम्ही मीडिया ट्रायलच्या विरोधात : ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी बुधवारी टिटागडमध्ये पोहोचल्या. येथे पार्थ चॅटर्जी यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या– मीडिया कांगारू कोर्टाची भूमिका बजावत आहे. आम्ही मीडिया ट्रायलच्या विरोधात आहोत. तुम्ही निश्चिंत राहा, 2024 मध्ये भाजप सत्तेवर येणार नाही, असे त्यांनी जनतेला सांगितले.
पार्थ प्रश्नांची उत्तरे देत नाही, अर्पिताने सहकार्य केले : ED
पार्थ चॅटर्जी चौकशीदरम्यान टाळाटाळ करत होते, तर त्यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांनी तपासाला पाठिंबा दिला होता.
भाजपचा आरोप - अर्पिताशिवाय आणखी एका महिलेचाही यात समावेश
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी रविवारी दावा केला की, अर्पिता यांच्याव्यतिरिक्त आणखी एका महिलेचाही या भरती घोटाळ्यात सहभाग आहे. त्यांचे नाव मोनालिसा दास आहे, ज्या व्यवसायाने शिक्षिका आहे आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या खूप जवळच्या आहेत. दास यांच्याकडे 10 फ्लॅट आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी. दुसरीकडे, मोनालिसाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. वृत्तानुसार, ED लवकरच या प्रकरणी मोनालिसाचीही चौकशी करू शकते.
पार्थ चॅटर्जी हे मधुमेहाचे रुग्ण
वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर पार्थ आणि अर्पितांची पुन्हा चौकशी केली जाईल. मेडिकल चेकअपमध्ये 69 वर्षीय पार्थ यांचे वजन 111 किलो असल्याचे आढळून आले. एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचे वय जास्त आहे. दुसरीकडे, पार्थ यांचा दावा आहे की त्यांना 15 वर्षांपासून मधुमेह आहे, त्यामुळे त्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात.
अर्पिता मुखर्जींच्या घरातून सापडली ब्लॅक डायरी
EDने सोमवारीही अनेक गोष्टी कलकत्ता उच्च न्यायालयासमोर ठेवल्या होत्या. यातील सर्वात महत्त्वाची ब्लॅक डायरी होती, जी पार्थ यांच्या जवळच्या सहकारी अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या घरातून तपास यंत्रणेने जप्त केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.