आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीशी संबंधित चौथ्या फ्लॅटवर छापा टाकला. अधिकृत सूत्रांनुसार, चिनार पार्क येथील हा फ्लॅटही अर्पिताचा आहे. तेथे गुरुवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. इतर फ्लॅटप्रमाणे तेथेही मोठी रोकड सापडेल, असा संशय ईडीला आहे. २२ जुलैला टॉलीगंजमधील अर्पिताच्या आणखी एका फ्लॅटमधून २१ कोटींवर रोकड मिळाली होती.
शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी या दोघांना २३ जुलैला अटक केली होती. हा कथित घोटाळा झाला तेव्हा पार्थ चटर्जी (६९) शिक्षण राज्यमंत्री होते. सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने गुरुवारी चटर्जींकडील सर्व विभाग काढून घेतले होते आणि त्यांचे पक्ष सदस्यत्व निलंबित केले होते. चटर्जींनी या वादावर शुक्रवारी प्रतिक्रिया दिली. पक्षाच्या निर्णयाबद्दल विचारले असता, ‘काळच त्याबाबत सांगू शकेल. माझ्याविरुद्ध कट केला जात आहे,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. शुक्रवारी वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना ईएसआय रुग्णालयात आणण्यात आले होते. तेव्हा रुग्णालयाबाहेर माध्यमांकडे त्यांनी ही टिप्पणी केली.
पार्थ चटर्जींकडे ११ वर्षांपूर्वी होते फक्त ६,३०० रुपये : निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार, पार्थ चटर्जी यांनी २०११ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याकडे फक्त रोख ६,३०० रुपये असल्याचे सांगितले होते. १० वर्षांत ही रक्कम २३.६ पट वाढली.
रुग्णालयात नेताना अर्पिता झाली बेशुद्ध
अर्पिताला शुक्रवारी तिसऱ्यांदा तपासणीसाठी रुग्णालयात नेले. अर्पिता कारमध्ये जोरजोरात रडू लागली आणि बेशुद्ध पडली. खाली उतरवल्यानंतर ती रस्त्यातच बसली.
अर्पिताच्या ४ कार गायब, सीसीटीव्हीची घेताहेत मदत
ईडीने २२ जुलैला अर्पिता मुखर्जीच्या टॉलीगंजमधील डायमंड सिटी कॉम्प्लेक्सच्या फ्लॅटवर छापे टाकले होते. तेथे ईडीला ऑडी ए 4, मर्सिडीज बेंझ, होंडा सीआरव्ही आणि होंडा सिटी या चार लक्झरी कार तेथे मिळाल्या होत्या. त्यापैकी दोन कार अर्पिताच्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होत्या. ईडी अधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशी केली तेव्हा या कार गायब झाल्याचे सांगण्यात येते. सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांचा माग काढला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.