आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी:शिक्षक भरती घोटाळा प्रकरण; अर्पिता यांच्या चौथ्या घरावरही छापा, अटकेनंतर ममता यांच्यावर दबाव

कोलकाता6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिक्षक भरती घोटाळ्यात अटक केलेल्या पार्थ चटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, पार्थ यांना तत्काळ प्रभावाने सर्व जबाबदारीतून मुक्त केले आहे. ममता म्हणाल्या, तृणमूल काँग्रेस भ्रष्टाचाराबाबत कठोर आहे, त्यामुळे पार्थ यांना हटवले आहे. त्यात बदल होऊ शकत नाही. पार्थ पाच वेळा आमदार आणि २०११ पासून मंत्री होते. याआधी त्यांनी बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. त्यांच्याकडे उ्दयोग, वाणिज्य आणि संसदीय कार्य यासारखी मंत्रालये होती.

पार्थ आणि त्यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जींना २३ जुलै रोजी अटक झाली होती. अटकेनंतर विरोधी पक्षांव्यतिरिक्त तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत पार्थ यांच्या मुद्‌द्यावरून दबाव वाढला होता. यादरम्यान, ईडीने गुरुवारी पार्थ यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या आणखी एका फ्लॅटवर छापा टाकला. ईडीने कोलकाता विमानतळाजवळ चिनार पार्कमध्ये छापा टाकला.

पक्षाच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत निर्णय
मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर ममता यांचे भाचे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शिस्तपालन समितीची बैठक बोलावून त्यांना संघटनेच्या पदांवरून हटवले. अभिषेक म्हणाले, चौकशी सुरू असेपर्यंत ते पक्षातून निलंबित असतील. निर्दाेषत्व सिद्ध झाल्यास ते पुन्हा पक्षात येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...