आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीनगर:काश्मिरात फरार पाेलिसासह आठ दहशतवाद्यांची धरपकड, मंदिरात ग्रेनेड हल्ल्याचा कट उधळला; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तान 250 अतिरेक्यांना भारतात घुसवू शकतो

जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी कारवाई करून ८ अतिरेक्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत. यात जैश-ए-माेहंमदच्या ४ आणि “जम्मू-काश्मीर गजनवी फोर्स’च्या दोन अतिरेक्यांचा समावेश आहे. त्यात अतिरेक्यांना जाऊन मिळालेल्या एका फरार एसपीआेचाही (विशेष पाेलिस अधिकारी) समावेश आहे. यासोबतच पोलिसांनी एका मंदिरात ग्रेनेड हल्ल्याचा कटही उधळला आहे.

पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यातील हयातपाेरामध्ये नाकेबंदी करून शोधमोहीम राबवली. यादरम्यान एका वाहनातून पळत असलेल्या जैशच्या चार अतिरेक्यांना पकडण्यात आले. त्यापैकी एक अल्ताफ हुसेन हा एसपीआे होता. तो दाेन एके-४७ रायफली घेऊन जहांगीर या दुसऱ्या एसपीआेसोबत फरार झाला होता. जहांगीरला आधीच अटक करण्यात आली आहे.

सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्याच्या मेंढरमधील दोन अतिरेकी भावांना एका वाहनातून पकडले. त्यांच्याकडून ६ हातगोळे व स्फोटके जप्त करण्यात आली आहे. दोघेही “जम्मू-काश्मीर गजनवी फोर्स’चे अतिरेकी आहेत. पूंछच्या अरी गावातील एका मंदिरात ग्रेनेड हल्ल्याचा कट रचल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बालाकाेट सेक्टरजवळून दोन अतिरेक्यांना पकडण्यात आले.

पाकिस्तान 250 अतिरेक्यांना भारतात घुसवू शकतो
पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) तणाव वाढवू शकतो, अशी शंका लष्कराच्या १५ व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पीओकेतील ‘लाँच पॅड’वर २०० ते २५० अतिरेकी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भारतीय सुरक्षा दले पूर्णपणे सजग आहेत.’

बातम्या आणखी आहेत...