आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Arrival Of Monsoon In Kerala; Low Pressure Area In Arabian Sea, Cyclone Likely To Hit Maharashtra Gujarat By June 3

हवामान:मान्सून ठरल्यावेळी केरळमध्ये दाखल; औरंगाबादेत 13 जूनला होणार आगमन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान्सून सरासरी गाठणार, देशात होणार 102 % पाऊस : आयएमडीचा अंदाज
  • यंदा सर्वत्र मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement

सोमवारी ठरल्यावेळी एक जूनला मान्सून केरळात दाखल झाला आहे. तेथे अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. देशाच्या इतर राज्यांतही मान्सून वेळेवर दाखल होईल. यंदा सामान्य ( सरासरीइतका) पावसाची शक्यता ४१% असल्याचे भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या दीर्घावधी अंदाजात म्हटले आहे. तर सरासरीहून कमी पावसाची शक्यता फक्त ५% असल्याचेही यात म्हटले आहे. मात्र, पहिल्या अंदाजात सुधारणा करताना विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर या काळात १०२% पाऊस होईल. यात ४ % कमी-जास्तीची शक्यता आहे. म्हणजे कमीत कमी ९६% आणि जास्तीत जास्त १०६ % पावसाची शक्यता आहे. पहिल्या अंदाजात विभागाने १००% पावसाचा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या दोन्ही भागात ते ३ जून रोजी धडकण्याची शक्यता आहे. 

अरबी समुद्रात चक्रीवादळ : महाराष्ट्रात उद्या ‘निसर्ग’ धडकणार; यलो अलर्ट

मुंबई | अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या दिशने सरकत आहे. ते अाणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तीन जूनला ते या दोन्ही राज्यांत धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी मुंबईत पाऊस झाला. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीआरएफ, आयएमडीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि वादळापासून संरक्षणाच्या तयारीबाबत चर्चा केली.

एनडीआरएफची ९ पथके तैनात  

गुजरात सरकारने सुरत, भरुच, नवसारी, वलसाड, डांग, अमरेली आणि भावनगर जिल्ह्याच्या सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी जाण्याचा आदेश दिला आहे. एनडीआरएफची १० पथके तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे एनडीआरएफची ९ पथके तैनात आहेत. 

डाॅ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज : राज्यात यंदा ९८% पाऊस

पुणे |  महाराष्ट्राच्या संदर्भात ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी विभागवार संभाव्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार ‘मराठवाड्यासह सर्व विभागांत सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल. तर जून आणि जुलैमध्ये पावसात खंड राहतील, असे डॉ. साबळे म्हणाले.’

Advertisement
0