आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
३७० कलम पुन्हा आणण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांना जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनाेज सिन्हा यांनी खडे बाेल सुनावले. दैनिक भास्करला दिलेल्या विशेष मुलाखतीत फारूक अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचे नाव न घेता ते म्हणाले, या नेत्यांनी अनेक घटनात्मक पदे भूषवली. वक्तव्ये करताना त्यांनी मर्यादा राखावी. राज्यात जिल्हा विकास परिषद निवडणुकांची धामधुम सुरू हाेत असतानाच सिन्हा यांनी ही मुलाखत दिली आहे.
काश्मिरी महिलांचा राजकारणातील सहभाग कसा वाढवणार?
काश्मिरात प्राचीन काळापासून महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. पाकिस्तानी टोळ्यांच्या मुकाबल्यासाठी देशातील महिलांची पहिली गनिमी फाैज जम्मू- काश्मिरातच तयार झाली हाेती. परंतु राजकीय कारणांमुळे त्यांना अधिकारांपासून वंचित ठेवले. परंतु आता असे नाही. देशाच्या अन्य भागाच्या तुलनेत येथील राजकारणात महिलांचा सहभाग जास्त आहे. राजाैरी जिल्ह्यातच १९ गट विकास परिषदेच्या अध्यक्षांमध्ये ९ महिला आहेत. १११ महिला सरपंच व ३६० पंच महिला आहेत. तळागाळातील लाेकशाहीत महिलांचा भक्कम सहभाग आहे.
> २६ नाेव्हेंबरला संविधान दिन साजरा हाेणार आहे? जम्मू-काश्मीरचा काय संदेश आहे?
जम्मू-काश्मीरचा एकच संदेश आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिला हाेता. तो म्हणजे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशाच्या संरक्षण आणि वैभवासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे
> काही तत्त्वे काश्मीरच्या लाेकांना ३७० कलम पुन्हा आणण्याचे स्वप्न दाखवत आहेत?
फक्त भारतातच लाेकांना काहीही बाेलण्याचे स्वातंत्र्य आहे. घटनात्मक पदे भूषवलेल्यांनी आपल्या विधानांची मर्यादा राखली पाहिजे. या मुद्द्यावर ते सुप्रीम कोर्टातही गेले आहेत. त्यांनी निर्णयाची प्रतीक्षा करायला नकाे का? त्यांच्या हास्यास्पद व बेताल बोलाचा जनतेवर काेणताही परिणाम हाेणार नाही.
> पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची घुसखाेरी सुरूच आहे. ती हाणून पाडण्यात किती यश मिळाले?
तोडीस तोड उत्तर दिले जात आहे. दहशतवाद निर्माण करण्याचे शेजारी देशांचे मनसुबे आम्ही यशस्वी हाेऊ देणार नाही. लाेकशाहीची प्रक्रिया सुरू व्हावी असे शेजारी देशाला वाटत नाही. त्यामुळेच ते दहशतवाद पसरवत आहेत. तळागाळातील लाेकशाहीच्या प्रक्रियेला धक्का लावणे व २६/११ सारख्या कटाची पुनरावृत्ती करण्याचे त्यांचे मनसुबे सुरक्षा दलाने नुकतेच उधळले. सीमेवरील घुसखाेरी नियंंत्रणात आली आहे.
> काश्मिरी तरुणांना राेजगाराच्या संधी देण्यासाठी सरकारच्या काय याेजना आहेत?
आतापर्यंत शिकल्या सवरलेल्या लाेेकांचा माेठा वर्ग नाेकरीवर अवलंबून हाेता. आम्ही त्यांना नाेकरीसाठी प्राेत्साहन दिले. स्वयंराेजगारासाठी प्रत्येक पंचायतीतून दाेन तरुण-तरुणींच्या निवडीचा निर्णय पुन्हा खेड्याकडे कार्यक्रमाच्या आधीच घेतला. आज राज्यात दीड महिन्यात १२ हजारपेक्षा जास्त युवक उद्याेजक तयार झाले. पुढील ५ वर्षात ८०% युवकांना राेजगाराच्या संधी दिल्या जातील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.