आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arvind Kejriwal And Bhagwant Mann Gujrat Visit । Kejriwal Mann Sabaramati Ashram Ahmedabad, Congress Criticizes AAP

AAPचे मिशन गुजरात:अहमदाबादच्या साबरमती आश्रमात केजरीवाल आणि मान, चरखाही फिरवला; काँग्रेस नेते म्हणाले- 'आप'साठी मजबुरी का नाम महात्मा गांधी!

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे लक्ष आता गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले. दोन्ही नेते आधी साबरमती आश्रमात गेले आणि तिथे त्यांनी चरखाही फिरवला. यानंतर दोघे अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत.

गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी मी आश्रमात आलो असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच गांधी आश्रमात आलो आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, मी स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमीतून आलो आहे. गुजरातमधील लोकही आंदोलक राहिलेले आहेत. देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी येथील जनता आपली भूमिका बजावेल.

रोड शोचे नाव 'तिरंगा यात्रा'

आम आदमी पार्टी गुजरातचे सरचिटणीस मनोज सोरठिया यांनी या रोड शोला 'तिरंगा यात्रा' असे नाव दिले आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर झालेल्या तोडफोडीनंतर, गुजरात आप युनिटने शहर पोलीस आयुक्त संजय श्रीवास्तव यांना दोन्ही नेत्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय करण्यास सांगितले आहे.

पक्षातील नेत्यांनुसार या रोड शोमध्ये दोन मुख्यमंत्री एकत्र येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल. त्याचवेळी गुजरातच्या जनतेमध्ये एक मोठा संदेश जाईल की, आम आदमी पार्टी यावेळी गुजरातची निवडणूक पूर्ण जोमाने लढणार आहे.

केजरीवाल आणि भगवंत मान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहेत.
केजरीवाल आणि भगवंत मान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहेत.

आपसाठी मजबुरी का नाम महात्मा गांधी! : श्रीनिवास

गुजरात दौऱ्यावर आलेले केजरीवाल आणि भगवंत मान यांनी साबरमती आश्रमात जाऊन चरखाही फिरवला. भगवंत मान आणि केजरीवाल यांच्या या कृतीवर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि म्हटले की, 'बापू संपूर्ण देशाचे 'राष्ट्रपिता' आहेत, पण 'आप'साठी मजबुरीचे नाव महात्मा गांधी आहे. पंजाबमध्ये सरकारी कार्यालयातून बापूंचे फोटो गायब करून सूत कातण्यासाठी गुजरात गाठले! हे दोघे निवडणुकीचा चरखा फिरवण्याचा कोणता प्रयत्न करत आहेत, हे जनतेला समजू लागले आहे.

सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया

केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या गुजरात दौऱ्याबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी आम आदमी पार्टी बाहेरचा असल्याचा आरोप केला आणि गुजराती लोक भाजपलाच आपले मत देतील, असे सांगितले. प्रीतेश पटेल नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले की, 'गुजराती भुलणार नाहीत, कोणीही फुकट घेत नाही आणि घेतले तरी ते भाजपलाच मतदान करतील.' केजरीवालांवर निशाणा साधताना हिमांशू प्रसाद नावाच्या व्यक्तीने लिहिले की, 'हा फसवणूक करणारा माणूस आहे, कृपया सावध राहा.'

केजरीवाल आणि भगवंत मान अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत.
केजरीवाल आणि भगवंत मान अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत.

इक्बाल सिंग यांच्या हत्येनंतर 'बी टीम' आता गुजरातमध्ये : आरुषा राठौर

आरुषा राठौर यांनी केजरीवाल यांच्या भेटीवर ट्विट करत लिहिले, 'काँग्रेस पक्षाच्या इक्बाल सिंह यांची हत्या केल्यानंतर आता 'बी टीम' गुजरातमध्ये पोहोचली आहे. तिथेही आता भगतसिंग, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने व्यापाऱ्यांना तिकीट देऊन निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...