आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arvind Kejriwal Announcement Updates; Delhi Free Ration Scheme To Coronavirus Death Compensation

महामारीत दिल्लीसाठी दिलासा:केजरीवाल 72 लाख लोकांना मोफत राशन देणार, संक्रमणामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना 50 हजारांची भरपाई आणि अडीच हजार पेंशन

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भ्रष्टाचार कमी करुन जे पैसे वाचवले, त्यांनी घोषणा पूर्ण करु - केजरीवाल

कोरोना संक्रमणाचा सामना करत असलेल्या दिल्लीसाठी अरविंद केजरीवाल सरकारने 4 मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये मोफत राशन, मृत्यूनंतर नुकसान भरपाई आणि प्रभावित पडलेल्या कुटुंबांना पेंशन देऊन दिलासा देण्यात आला आहे. केजरीवाल म्हणाले की, आम्ही आशा करतो की, या घोषणांमुळे लोकांना खूप दिलासा मिळाला असेल.

पहिली घोषणा : मोफत राशन
केजरीवाल म्हणाले - दिल्ली सरकार 72 लाख लोकांना 5 किलोश राशन देते, या महिन्यात हे राशन मोफत मिळेल. 5 किलो दिल्ली सरकार देणार आहे तर 5 किलो पंतप्रधान योजनेअंतर्गत म्हणजेच एकूण 10 किलो राशन मोफत मिळणार आहे. असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या जवळ राशन कार्ड नाही. त्यांनाही राशन दिले जाणार आहे. गेल्या वेळीही आम्ही असे केले होते आणि यावेळीही असे केले जाणार आहे, जे राशन मागतील, त्यांना राशन दिले जाईल.

दुसरी घोषणा : भरपाई
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आता या संकटाच्या काळात अशा लोकांच्या कुटुंबियांना थोडी मदत पोहोचवली जाऊ शकते. ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे द्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची नुकसान भरपाई मिळेल.

तिसरी घोषणा : पेंशन
असे अनेक कुटुंब आहे, ज्यांच्या घरात कमावत्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबियांना 50 हजारांची नुकसान भरपाई आणि अडीच हजार रुपये महिना पेंशन दिली जाणार आहे.

चौथी घोषणा : अनाथ मुलांना दिली जाणार मदत
कोरोनामुळे ज्या मुलांनी आपले आई-वडील गमावला आहेत, त्यांना 2,500 रुगपये महिना दिला जाईल. ही मदत त्यांना वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत मिळत राहिल. यासोबतच त्यांना मोफत शिक्षणही दिले जाईल.

भ्रष्टाचार कमी करुन जे पैसे वाचवले, त्यांनी घोषणा पूर्ण करु - केजरीवाल
केजरीवाल म्हणाले - दिल्ली सरकारने प्रामाणिकपणे काम केले आहे आणि भ्रष्टाचार कमी केला आहे. जो पैसा भ्रष्टाचार कमी झाल्यामुळे वाचला आहे, त्यामधूनच या घोषणा पूर्ण केल्या जातील. लॉकडाऊनमुळे रोजगार संपला आहे. अनेकांनी आपले घरातील लोक गमावला आहेत. घरातील कमावत्या लोकांनी जीव गमावला आहे. मुले अनाथ झाली आहेत, वयस्कर हे एकटे पडले आहेत. अशा लोकांना या घोषणांमुळे दिलासा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...