आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खालिस्तानी समर्थक असल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर केजरीवाल विरोधकांवर हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहे. आज केजरीवाल लखनऊ दौऱ्यावर असून, त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी हिंदी चित्रपट शोलेचा प्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून विरोधकांनावर टीकेची झोड उठवली.
'भ्रष्टाचाराला धमकावणारा दहशतवादी'
केजरीवाल म्हणाले की, दहशतवादी दोन प्रकाराचे असतात. एक जो जनतेला घाबरवतो आणि दुसरा जो भ्रष्टाचाऱ्यांना घाबरवतो. असे दोन प्रकारचे दहशतवादी असतात. पुढे केजरीवाल म्हणाले मी, असा दहशतवादी आहे जो भ्रष्टाचार करणाऱ्यांना घाबरवतो. पुढे केजरीवाल यांनी हिंदी चित्रपट शोले यामधील एका डायलॉगच्या माध्यमातून हल्लाबोल केला, ते म्हणाले की, मुलगा 100-100 मैल भ्रष्टाचार करतो, तेव्हा आई म्हणते झोप बाळा झोप नाहीतर केजरीवाल येईल.
यापूर्वी दहशतवादीच्या आरोपावर केजरीवाल म्हणाले होते की, ज्या व्यक्तीला आपण दहशतवादी म्हणत आहात, त्याने दिल्लीतील सरकारी शाळेत 12,340 स्मार्ट वर्ग तयार केले आहेत. केजरीवाल पुढे म्हणाले की, देशातील सर्व भ्रष्टाचारी माझ्या विरोधात एकत्र आले आहेत.
कुमार विश्वासने लावले होते आरोप
सर्वात अगोदर आम आदमी पार्टीचे माजी नेते कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर पंजाबमध्ये फुटीरतावादीला समर्थक देण्याचा आरोप लावला होता. त्यानंतर केजरीवाल यांच्यावर भाजपसह काँग्रेसने देखील दहशतवादीचे आरोप लावले होते. त्यावर केजरीवाल म्हणाले होते की, मी जगातील सर्वात गोड दहशतवादी आहे. जो मुलांसाठी शाळा बनवते, गरिबांसाठी हॉस्पिटल बनवतो. असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले होते. याप्रकरणी वाद वाढत असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले की, कुमार विश्वास यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.