आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arvind Kejriwal; Delhi Oxygen Requirement | BJP Sambit Patra Manish Sisodia On SC Report Panel

ऑक्सिजनवर दिल्लीचे राजकारण:संबित पात्रांच्या आरोपावर मनीष सिसोदिया यांचा पलटवार- BJP मुख्यालयात बनवलेल्या रिपोर्टला कोणी अप्रूव्ह केले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाच्या पॅनेलच्या अहवालावरून भाजप आणि दिल्ली सरकार पुन्हा आमनेसामने उभे आहेत. या अहवालात असे म्हटले आहे की, दिल्लीमध्ये कोरोना संकट काळात केजरीवाल सरकारने आवश्यकतेपेक्षा 4 पट ऑक्सिजनची मागणी केली. याचा परिणाम 12 राज्यांच्या पुरवठ्यावर झाला.

हा अहवाल समोर आल्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, केजरीवालांच्या खोटेपणामुळे 12 राज्ये प्रभावित झाली आहेत. 20-25 मिनिटांनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, असा कोणताही अहवाल नाही. हा अहवाल भाजप मुख्यालयात बसून करण्यात आला आहे.

केजरीवाल अपयशी ठरत होते, त्यामुळे त्यांना इतरांवर दोष ठेवायचा होता : भाजपा
संबित पात्रा म्हणाले, "दिल्लीत ऑक्सिजनबाबत कोणत्या प्रकारचे राजकारण केले गेले आहे, याचा रिपोर्ट आपण पाहिला आहे. दुसर्‍या लाटेत दिल्ली संकटात होती. परंतु केजरीवालांनी ऑक्सिजनवर केलेले राजकारण या अहवालातून उघड झाले आहे. ऑक्सिजनवर कोणी राजकारण करू शकते का? पण केजरीवाल यांनी असे खालच्या पातळीचे राजकारण केले."

दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते की, केंद्र सरकार मागणीइतका ऑक्सिजन पुरवठा करत नाही. सुप्रीम कोर्टाने गठित केलेल्या पॅनेलच्या अहवालात असे दिसून आले आहे की, केजरीवाल यांनी आवश्यकतेपेक्षा चारपट अधिक ऑक्सिजनची मागणी केली. त्यांच्या या खोटेपणामुळे बारा राज्यांना त्रास झाला.

पात्रा पुढे म्हणाले की, कोरोनाच्या वेळी आप सरकार अयशस्वी होत होते आणि त्यांना एखाद्यावर दोष ठेवायच होता. म्हणूनच आप सरकारने ऑक्सिजनच्या कमतरतेची बतावणी करण्यास सुरुवात केली. केजरीवाल यांनी इतर राज्यांना दोष देण्यास सुरवात केली. केजरीवाल यांनी 1140 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली होती. दिल्लीच्या रुग्णालयांचे ऑडिट केले गेले असता केजरीवाल यांनी 4 पट अधिक ऑक्सिजनची मागणी केल्याचे आढळले. केजरीवाल यांनी केलेला हा एक भयंकर गुन्हा आहे.

भाजपला आव्हान देतो, असा काही अहवाल असल्यास तो समोर आणा : सिसोदिया
मनीष सिसोदिया म्हणाले, "असा कोणताही अहवाल नाही की, ज्यावरून भाजपा नेते केजरीवाल यांच्यावर शिवीगाळ करत आहेत. भाजप खोटे बोलत आहे. सुप्रीम कोर्टाने ऑक्सिजन ऑडिट कमिटीची स्थापना केली होती. आम्ही त्या सदस्यांशी बोललो आहोत. प्रत्येकजण म्हणतो आहे की, त्यांनी कोणत्याही अहवालावर अजिबात स्वाक्षरी केलेली नाही. जेव्हा ऑक्सिजन ऑडिट कमिटीच्या सदस्यांनी कोणत्याही अहवालावर स्वाक्षरी केली किंवा मान्यता दिली नसेल तर हा अहवाल कोठे आहे? हा कोणता अहवाल आहे? तो कोठून आला? ऑक्सिजन ऑडिट कमिटीचा असा कोणता रिपोर्ट आहे का, जो कमिटी मेम्बर्सने अप्रूव्ह केला किंवा स्वाक्षरी केला आहे?

"मी भाजप नेत्यांना असा अहवाल आणण्याचे आव्हान देतो. खोटे आणि गैरवर्तन वाढले आहे आणि भाजपा या शिखरावर पोहोचला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. कायदेशीर प्रकरणांमध्ये अशा गोष्टी योग्य नाहीत असे मला म्हणायचे आहे. एप्रिल महिन्यात ऑक्सिजनचे एक संकट होते. जे लोक रुग्णालयात होते त्यांना हे चांगलेच माहिती आहे. याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, ज्यांनी संपूर्ण देशात ऑक्सिजन चुकीचे वितरण केले."

बातम्या आणखी आहेत...