आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या मुख्यंमत्र्यांनी राजीनामा द्यावा:मोरबी दुर्घटनेवर अरविंद केजरीवाल यांची मागणी; म्हणाले - हे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तत्काल आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. मोरबी दुर्घटना भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. घडी बनवणाऱ्या कंपनीला पुलाचा ठेका का देण्यात आला? या कंपनीकडे पुलाची दुरुस्ती करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. म्हणजे त्यांचे भाजपशी संबंध आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

FIR मध्ये कंपनी व तिच्या मालकांचे नाव का नाही

केजरीवाल पुढे म्हणाले की, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये कंपनी व तिच्या मालकांचे नाव नाही. रुग्णालयाची रंगरंगोटी तर वेगळा मुद्दा आहे. या प्रकरणी दुर्घटनेवरच पडदा टाकला जात आहे. या प्रकरणी कंपनीने सत्ताधारी पक्षाला मोठा निधी दिल्याचीही चर्चा आहे. याचा शोध घ्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांना आपल्या खुर्चीवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी राजीनामा देऊन तत्काळ निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले - 'या अपघातामुळे अवघा देश स्तब्ध झाला आहे. किती निष्पाप मुले मारली गेली. जे पुरावे उजेडात आले, त्यावरून हा अपघात नव्हे तर हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.'

सिसोदियांचे 5 प्रश्न

सिसोदिया यांनी या प्रकरणी भाजपला 5 प्रश्नही विचारले आहेत. ते म्हणाले - हे भाजपच्या भ्रष्टाचारामुळे घडले. माझे 150 जणांच्या मारेकऱ्यांना 5 प्रश्न आहेत. हे भाजपच्या भ्रष्टाचारामुळे घडले. माझे 150 जणांच्या मारेकऱ्यांना 5 प्रश्न आहेत.' 1)- मोरबी पुलाच्या पुनर्बांधणीचा ठेका घडी तयार करणाऱ्या कंपनीला का देण्यात आला? 2) -एवढ्या मोठ्या कामाचा ठेका विनाटेंडर का देण्यात आला? 3) - यासंबंधीच्या दस्तावेजांनुसार हे काम 8 महिन्यांत पूर्ण होणार होते. पण ते 5 महिन्यांतच पूर्ण करून पूल का सुरू करण्यात आला? 4) - घडी बनवणाऱ्या कंपनीने भाजपला किती निधी दिला. या कंपनीच्या मालक कोणत्या भाजप नेत्याचे निकटवर्तीय आहेत. 5) एवढ्या दुर्घटनेनंतर दाखल झालेल्या एफआयआरमध्ये कंपनीच्या मालकांचे नाव का नाही. कुणाच्या दबावाखाली मालकांचे नाव त्यातून वगळण्यात आले.'

आतापर्यंत 134 जणांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या मंगळवारी 141वर पोहोचली. रविवारी सायंकाळी 6.30 वाजता 765 फूट लांब व अवघा 4.5 फूट रुंद हा झुलता केबल पूल कोसळला. हा 143 वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल होता.

गेल्या 6 महिन्यांपासून हा पूल बंद होता. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली. दुर्घटनेच्या 5 दिवस आधी 25 ऑक्टोबरला हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. रविवारी येथील गर्दी क्षमतेपेक्षा जास्त होती. हेदेखील अपघाताचे कारण असल्याचे बोलले जात आहे. या अपघाताचा 30 सेकंदांचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात 15 सेकंदांनंतर पूल तुटल्याने लोक मच्छू नदीत वाहून गेले.

बातम्या आणखी आहेत...