आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arvind Kejriwal Pays Tribute Mahatma Gandhi At Rajghat | Manish Sisodia | Delhi News

सिसोदियांच्या अटकेवर केजरीवाल ध्यानस्थ:बापूंच्या समाधीवर नतमस्तक; AAP नेते सौरभ म्हणाले- केंद्राला सिसोदियांची राजकीय हत्या करायची

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बुधवारी राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळासमोर ध्यानस्थ झाले. त्यांनी होळी साजरी करणार नसल्याचे स्पष्ट केले.  - Divya Marathi
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बुधवारी राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळासमोर ध्यानस्थ झाले. त्यांनी होळी साजरी करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बुधवारी राजघाटावर पोहोचले. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर सिसोदिया यांच्या अटकेविरोधात ध्यानस्थ बसले. त्याचवेळी 'आप'च्या वतीने मनीष सिसोदिया यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक 1 मध्ये ठेवण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्राला सिसोदिया यांची राजकीय हत्या करायची आहे, असा आरोप आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केला.

आपचे म्हणणे आहे की, या तुरुंगात दहशतवादी आहेत. सिसोदिया यांनी विपश्यना कक्षात ठेवण्याची मागणी केली होती, त्यांना तिथेच ठेवण्याची मागणी केली. केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया यांना तिहारच्या जेल क्रमांक 1 मध्ये काही षड्यंत्राखाली ठेवण्यात आले आहे. असे पहिले ट्रायल असताना या कारागृहात लोकांना ठेवले जात नाही.

पत्रकार परिषदेत सौरभ भारद्वाज म्हणाले की, या तुरुंगात डेंजर दहशतवादी आहेत, सिसोदिया यांना विपश्यना कक्षात ठेवण्याची मागणी केली होती. तरी देखील त्यांना हलविण्यात आले.
पत्रकार परिषदेत सौरभ भारद्वाज म्हणाले की, या तुरुंगात डेंजर दहशतवादी आहेत, सिसोदिया यांना विपश्यना कक्षात ठेवण्याची मागणी केली होती. तरी देखील त्यांना हलविण्यात आले.

राजकारणात नुकसान करता आले नाही, तर जेलमध्ये पाठवले
केजरीवाल म्हणाले की, या कारागृहात राहणारे कैदी छोट्याशा इशार्‍यावरही कुणाचीही हत्या करू शकतात. भाजपचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, पण राजकारणात असे वैर होते का? जर तुम्ही आम्हाला दिल्लीत पराभूत करू शकला नाही, एमसीडीमध्ये आमचा पराभव करू शकला नाही, तर या पराभवाचा बदला अशा प्रकारे घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधत केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान या प्रकरणी गप्प का बसले आहेत. जर ते आपचे राजकीय नुकसान करू शकत नसतील तर त्यांना तुरुंगात पाठवायचे. आता आमच्या नेत्यांच्या हत्येचा कट रचला जात आहे.

केजरीवाल म्हणाले - मला देशाची काळजी
पक्षाचे नेते सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे ते बुधवारी ध्यानस्थ करतील आणि होळी साजरी करणार नाहीत, अशी घोषणा मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंगळवारी केली होती. देशातील परिस्थिती चिंताजनक असून त्यामुळे देशासाठी प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. सिसोदिया आणि जैन जेलमध्ये आहेत पण अदानी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशासाठी राजघाटावर ध्यानस्थ झाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशासाठी राजघाटावर ध्यानस्थ झाले.

जे चांगले काम करतात त्यांना जेलमध्ये टाकले जातात
ज्या देशाचे पंतप्रधान लोकांना चांगले शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा देणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकतात. ज्यांनी देशाची लूट केली त्यांना ते पाठीशी घालतात, हे चिंताजनक आहे. मी देशासाठी ध्यान आणि प्रार्थना करीन. जर तुम्हालाही वाटत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करत आहेत ते चुकीचे आहे. तुम्हालाही देशाची काळजी आहे, तर माझी तुम्हाला विनंती आहे की, होळी साजरी केल्यानंतर कृपया वेळ काढून देशासाठी प्रार्थना करा, असे आवाहन केजरीवाल यांनी केला आहे.

पुढे बोलताना CM केजरीवाल म्हणाले की, जैन आणि सिसोदिया तुरुंगात असल्याने मला काळजी नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते शूर आहेत आणि देशासाठी बलिदान देण्यास तयार आहेत. पण देशाची दयनीय स्थिती मला चिंताग्रस्त करित आहेत.

हे ही वाचा

मनीष सिसोदियांची तिहारमध्ये EDकडून चौकशी:केजरीवाल म्हणाले- देशभक्तावर खोटी केस, कोठडीमुळे सिसोदियांचे धैर्य कमी होणार नाही

दिल्ली मद्य घोटाळ्यात सीबीआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ही मनीष सिसोदिया यांची चौकशी करणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी ईडी तिहार तुरुंगात पोहोचली आहे. यापूर्वी, ईडीने सिसोदिया यांचा जबाब नोंदवण्यासाठी राऊज अव्हेन्यू कोर्टाकडे परवानगी मागितली होती.- येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...