आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांच्या मीटिंगमध्ये राजकारण:प्रोटोकॉल मोडण्यावरून केजरीवाल यांना मोदींनी बोलताना रोखले; केजरीवाल म्हणाले- चूक झाली असेल तर माफी मागतो

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इन हाउस मीटिंगच्या थेट प्रक्षेपणावर मोदींचा आक्षेप, म्हणाले हे परमपरेच्या विरोधात
  • ऑक्सिजनची टंचाई आणि लसींच्या रेट कार्डवर केजरीवालांनी केली होती तक्रार

10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान वाढत्या कोरोनाच्या मुद्द्यावर मीटिंग करत होते पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये विचित्र गोष्ट समोर आली. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीच्या मुद्द्यावरुन ही बैठक घेण्यात आली. मात्र ही संपूर्ण बैठक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लाइव्ह प्रसारण करण्यावर अडकली. 10 राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत ऑनलाइन होते. ज्यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलणे सुरू केले तेव्हा बैठकीचे थेट प्रसारण देशाच्या टीव्ही चॅनलवर सुरू झाले. केजरीवाल यांचा लहेजा कठोर होता. यानंतर या मीटिंगचे लाइव्ह प्रसारण केल्यामुळे पंतप्रधानांनी केजरीवालांना टोकले.

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांसमोर अनेक मुद्दे मांडले. यानंतर पंतप्रधान त्यांना टोकत म्हणाले की, 'एक मिनिट, एक गोष्ट मला बोलायचे आहे की, हे आपल्या परंपरेविरोधात होत आहे, आपले जे प्रोटोकॉल आहेत, त्याविरोधात हे होत आहे. कोणताही मुख्यमंत्री अशा इनहाउस मीटिंग लाइव्ह टेलिकास्ट करु शकत नाही. हे योग्य नाही. आपण नेहमी याचे पालन केले पाहिजे.'

केजरीवाल शांत होतात. त्यांचा टोनही शांत होतो आणि ते बोलतात, 'ठिक आहे सर, यापुढे लक्षात ठेवेल. सर्व आत्मांना शाती मिळावी, ज्या ज्या लोकांचा या दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी. सर जर माझ्याकडून काही चुकले असेल... मी काही कठोर बोललो असेल, माझ्या वागण्यात काही चूक झाली असेल, भूल झाली असेल तर मी माफी मागतो. आतापर्यंत जेवढे प्रेझेंटेशन झाले ते चांगले होते. तुम्ही आम्हाला ज्या प्रकारे निर्देश दिले होते त्याचे पालन करू.' यानंतर चहुबाजूंनी आरोप प्रत्यारोप करण्यात झाली आहे.

बैठकीत काय म्हणाले केजरीवाल?
केजरीवाल पंतप्रधानांना म्हणत होते - आम्ही आभारी आहोत की, केंद्र सरकारने दिल्लीचा ऑक्सिजन कोटा वाढवला आहे. मात्र परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. आम्ही कोणालाही मरण्यासाठी सोडू शकत नाही. आम्ही गेल्या काही दिवसात केंद्राच्या मंत्र्यांनाही फोन केले आहेत. त्यांनी पहिले मदत केली आहे, पण आता ते देखील थकले आहेत.

केजरीवाल म्हणाले, 'राष्ट्रीय योजना बनली पाहिजे. त्याअंतर्गत सरकारने देशातील सर्व ऑक्सिजन प्लांट सैन्याच्या माध्यमातून ताब्यात घ्यावेत. प्रत्येक ट्रकसह सैन्य एस्कॉर्ट वाहन असल्यास, कोणीही ते थांबवू शकणार नाही. 100 टन ऑक्सिजन बंगालच्या ओडिशा येथून येणार आहे. आम्ही त्याला दिल्लीत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य असल्यास विमानाने आम्हाला द्या किंवा ऑक्सिजन एक्सप्रेसची कल्पना असल्यास आम्हाला त्यातून ऑक्सिजन मिळेल.' यावर पंतप्रधानांनी केजरीवाल यांना रोखले आणि सांगितले की ऑक्सिजन एक्सप्रेस आधीच सुरू आहे.

देशभरातील ऑक्सिजन प्लांट सैन्याच्या स्वाधीन करा

केजरीवाल म्हणाले, 'राष्ट्रीय योजना बनली पाहिजे. त्याअंतर्गत सरकारने देशातील सर्व ऑक्सिजन प्लांट सैन्याच्या माध्यमातून ताब्यात घ्यावेत. प्रत्येक ट्रकसह सैन्य एस्कॉर्ट वाहन असल्यास, कोणीही ते थांबवू शकणार नाही. 100 टन ऑक्सिजन बंगालच्या ओडिशा येथून येणार आहे. आम्ही त्याला दिल्लीत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य असल्यास विमानाने आम्हाला द्या किंवा ऑक्सिजन एक्सप्रेसची कल्पना असल्यास आम्हाला त्यातून ऑक्सिजन मिळेल.' यावर पंतप्रधानांनी केजरीवाल यांना रोखले आणि सांगितले की ऑक्सिजन एक्सप्रेस आधीच सुरू आहे.

केजरीवाल म्हणाले, 'हो पण दिल्लीत येत नाहीये, इतर राज्यांमध्ये सुरू आहे.'
अनेक मुद्द्यांवर अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले. यानंतर सर्व चॅनलवर हे प्रसारण अचानक थांबले. तेव्हा जवळपास 12 वाजत होते. यानंतर जवळपास दोन तासांनंतर पुन्हा एकदा चॅनलवर केजरीवाल दिसले.

आता ते म्हणत होते, 'मला विश्वास आहे की, जर देशात एक नॅशनल प्लान असेल तर आपण सर्व राज्य सरकार केंद्रासोबत मिळून काम करु. तसेच कोरोनामुळे दिवंगत आत्मांना शांती मिळावी...'

बातम्या आणखी आहेत...