आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arvind Kejriwal VS BJP Sting Operation I Sambit Patra On Delhi Government I Latest News 

MCD निवडणुकीवर भाजपचे स्टिंग:BJPचा दावा- 'आप' नेत्यांनी पक्षाच्या महिला उमेदवाराकडून तिकिटासाठी 80 लाखांची मागणी केली

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमसीडी ( Municipal Corporation of Delhi) निवडणुकीपूर्वी भाजपने सोमवारी स्टिंग ऑपरेशन जाहीर केले आहे. निवडणुकीत तिकीट देण्यासाठी 'आप'चे नेते 80 लाख रुपयांची मागणी करत असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी हा दावा केला. ते म्हणाले की, प्रभाग क्रमांक 54 मधील उमेदवार तथा आप नेत्या बिंदू यांच्याकडून तिकीटासाठी पैशाची मागणी केली आहे.

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक व्हिडिओ पब्लिक केला. यात आप नेत्या बिंदू तिकिटासाठी पैसे मागताना दिसत आहे. या स्टिंगमध्ये आप नेते आर. आर. पठानिया यांचेही नाव समोर आले आहे.

पहिला व्हिडिओ रेस्टॉरंटमधला

एक महिला आणि दोन लोक बोलत आहेत. संभाषणात, ती बाई पुनीतला विचारते की, पठानियाजींना माहित आहे का. तर पुनीतने उत्तर दिले की, पठानियाजी यांना माहित आहे. यानंतर महिलेने सांगितले की, तुम्ही म्हणाल तर अर्धे पैसे आता देते. आणि बाकीचे नंतर देऊ. तेव्हा ती व्यक्ती म्हणते की, तुम्ही 2 दिवसांनी पूर्ण पेमेंट करा.

दुसरा व्हिडिओ कारमधील

महिला बिंदू कारमध्ये फोनवर बोलत आहे. यामध्ये ती पठानियाजी म्हणून संबोधत आहे. ती म्हणाली- पठानियाजी एक मोठी केस आहे. जर तुम्ही मला म्हणाले की, बिंदू पुनीतला पैसे देण्यास सांगितले. तर मी त्यांना देईन. तुमचा ग्रीन सिग्नल आवश्यक आहे. यानंतर पठानिया म्हणतो की, हो तो माझ्यासोबत राहतो. मी जिथे जातो तिथे असतो. पक्षातील लोक त्यांना ओळखू लागले आहेत. त्यांचे फोनही उचलू लागले आहेत. हे काम तो स्वत: करत आहे. यानंतर बिंदू म्हणते की, रक्कम लहान किंवा मोठी नाही. मी म्हणाले की, आता 10 घ्या. तर त्याने सांगितले की, तुम्ही 3-4 दिवसात पूर्ण रक्कम भरा. पहिली रक्कम 21 लाखांची आहे.

भाजपचा आरोप- गोपाल राय, सौरव भारद्वाज यांचा समावेश
संबित पात्रा म्हणाले- पठानियाजी स्वतः पैशासंदर्भात सांगत आहेत. संभाषणात गोपाल राय, सौरभ भारद्वाज, राखी बिर्ला यांची नावे देखील येत आहेत. त्यामुळे तिकिटासाठी पैसा घेतला जात आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

तीन दिवसांपूर्वीही स्टिंगचा व्हिडिओही जारी केला होता
गेल्या आठवड्यातच भाजपने आप नेते मुकेश गोयल यांचा स्टिंग व्हिडिओ जारी केला होता. संबित पात्रा यांनी मुकेश वर जेईकडून एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. संबित म्हणाले होते की, मुकेश हे एमसीडीचे नेते मानले जातात. ते मुख्यमंत्री केजरीवाल यांचे राईट हॅन्ड आहेत. केजरीवाल एमसीडीशी संबंधित बाबींमध्ये मुकेश गोयल यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत, असाही आरोप पात्रा यांनी केला होता. मात्र, या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण देताना मुकेश म्हणाले होते की, भाजपने बनावट ऑडिओ जारी केला आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप मुकेश यांनी केला होता.

भाजपच्या स्टिंगवर केजरीवालांचे प्रत्युत्तर
भाजपच्या स्टिंगला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, भाजपवाले रोज नवनवीन नौटंकी करतात. आधी दिल्लीत दारू घोटाळा झाला असे सांगितले, मग फक्त घोटाळा असल्याचे सांगितले. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. आरोपांची चौकशी करा, काहीही निष्पन्न होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...