आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:आर्य समाज विवाह प्रमाणपत्र जारी करू शकत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्य समाजाला विवाह प्रमाणपत्र जारी करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचाराच्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

न्या. अजय रस्तोगी आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांनी अपहृत आरोपीच्या जामिनावरील सुनावणीदरम्यान सांगितले की, विवाह प्रमाणपत्र जारी करणे आर्य समाजाचे काम नाही. न्यायालयात हे मान्य नाही. राजस्थानच्या नागौरचे रहिवासी सुनील लोरा यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका दाखल करून जामिनाची मागणी केली होती. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार प्रकरणात सुनीलविरुद्ध पॉक्सो कायदा, अत्याचार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या वतीने हजर वकिलाने न्यायालयात सांगितले की, सुनीलचे पीडितेशी प्रेमसंबंध होते. दोघांनी घरातून पळून आर्य समाज मंदिरात लग्न केले. लग्नासाठी मुलगी अल्पवयीन होती.

बातम्या आणखी आहेत...