आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात पुन्हा तेच दृश्य:पाण्याची पातळी वाढताच उन्नावमध्ये गंगेत पुन्हा तरंगताना दिसले मृतदेह

लखनऊ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक म्हणतात- 250पेक्षा जास्त मृतदेह दिसले, प्रशासनाने दावा फेटाळला

उत्तर प्रदेशात गंगा नदीत वाहणारे मृतदेह दिसणे थांबत नसल्याचे दिसते. आता उन्नावमधून पुन्हा एकदा धक्कादायक छायाचित्रे समोर आली आहेत. बारसगबर पोलिस ठाण्यातील बक्सर घाटाच्या गंगाकिनारी जे मृतदेह पुरण्यात आले होते आता तेच मृतदेह गंगा नदीत वाहताना दिसत आहेत. बिघापूर तालुक्यातील बक्सर घाटात पाणीपातळी वाढल्याने वाळू वाहणे सुरू झाले आहे. यामुळे मृतदेह आणि त्यांचे अवयव पाण्यात वाहू लागले, ते बघून लोकांना धक्का बसला आहे.

बक्सर घाटावर १५ दिवसांपूर्वी नदीकाठावर मृतदेह पुरण्यात आले होते. पाणी वाढल्याने ते पुन्हा वर आले आहेत. परिसरातील गावातील लोकांचे म्हणणे आहे की, आधी जसे दृश्य होते तसेच काहीसे पुन्हा दिसू लागले आहे. मात्र, बिघापूरचे एसडीएम दया शंकर पाठक यांनी मृतदेह तरंगत असल्याचे नाकारले आहे. त्यांच्यानुसार मंडळ अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांसोबत आम्ही पाहणी केली आहे. त्या वेळी एकही मृतदेह गंगा नदीत वाहताना दिसला नाही. दहा मिनिटांपूर्वीच पूर्ण परिसराची पाहणी केली. व्हिडिओ दाखवू शकतो. कोणत्याही ठिकाणी मृतदेह गंगा नदीत वाहताना आढळले नाही.

एसडीएम म्हणाले- १२ ते १४ महिन्यांआधीचे मृतदेह, कबीरपंथींनी पारंपरिक पद्धतीने पुरलेले
एसडीएम सत्यप्रिय सिंह यांनी सांगितले की, १२-१४ महिन्यांमध्ये हे मृतदेह पुरण्यात आले आहेत. येथील पंड्यांकडे रोज येणाऱ्या मृतदेहांचा तपशील असतो. त्यांचा पत्ता घेऊन जवळपास ३ डझनपेक्षा जास्त गावांचे अंत्यसंस्कार केले जातात. हे कबीरपंथी आहेत, त्यांनी पारंपरिक पद्धतीनुसार येथे मृतदेह पुरले आहेत. याशिवाय अविवाहित मुले आणि ज्यांची मुंज झालेली नसते त्यांचे मृतदेह येथे पुरले जातात.

रौतापूर घाटावरही दिसले मृतदेह, मात्र कोरोनाबाधितांचे नसल्याचे सांगितले जाते
उन्नाव तालुक्यातील हाजीपूर चौकीपासून काही अंतरावरील रौतापूर घाटावरही बक्सर घाटासारखेच दृश्य पाहायला मिळाले. मात्र, येथील मृतदेह कोविडबाधित मृतांचे नसल्याचे सांगितले जात आहे. एकाने सांगितले की, मृतदेह एक ते दीड वर्षाचे वाटतात. कोरोनाबाधितांचे नाहीत. तर रौतापूरचे सरपंच सर्वेशकुमार यांनी सांगितले की, गावात अनुसूचित जातीचे ४० जण आहेत, ते मृतदेह जाळत नाहीत. त्यांना असेच पुरण्यात येते.

एकाच वेळी ६ मृतदेह वाहत होते
बक्सर घाटाचे स्थानिक रहिवासी राहुलने सांगितले की, जाळणारे मृतदेह जाळतात, पुरण्यासाठी पुढे जागा देण्यात आली आहे. एकाच वेळी ५ ते ६ मृतदेह वाहताना दिसले. रविवारपासून आतापर्यंत २५० मृतदेह वाहताना दिसले. पुरण्यासाठी लोकांनी ३ फुटांचा खड्डा खाेदून मृतदेह टाकला. यामुळे आता ते बाहेर येत आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...