आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Asaduddin Owaisi AIMIM Vs BJP Party Performance In Hyderabad GHMC Election 2020; All You Need To Know

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सप्लेनर:गल्ली-बोळातील निवडणुकीतही पाकिस्तान आणि जिन्नांनी केली भाजपची मदत; हैदराबादच्या निवडणुकीत अशा वाढल्या भाजपच्या जागा

प्रियंक द्विवेदी, हैदराबादएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • कळत-नकळत पश्चिम बंगालमध्ये एमआयएम करू शकते भाजपला मदत

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकींना राष्ट्रीय स्तरावर इतकी चर्चा आतापर्यंत कधीच मिळाली नव्हती. त्याचे कारणही खास आहे. या निवडणुकीत भाजपने 150 पैकी 48 जागा जिंकल्या. यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. सत्ताधारी टीआरएसला 55 आणि एमआयएमला 44 जागांवरून विजय मिळाला आहे. जेथे भाजपची चर्चा सुद्धा होता तेथे तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कसा बनला. यासाठी भाजपने नेमकी कोणती खेळी केली, त्यावर हे विश्लेषण...

अशी आहे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका
GHMC अर्थातच हैदराबाद महापालिकेचे वार्षिक बजेट 6,150 कोटी रुपये आहे. 80 लाख लोकसंख्या असलेल्या या भागातील जवळपास 40% लोकसंख्या मुस्लिम आहे. 2007 पासून याला ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका असे म्हटले जाते. याची 7 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. येथे एक महापौर आणि एक उपमहापौर असतो.

या महापालिका अंतर्गत विधानसभेच्या तब्बल 24 आणि लोकसभेचे 5 मतदार संघ येतात. AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी येथूनच लोकसभा खासदार आहेत. सध्या या महापालिकेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचे पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचा अर्थात टीआरएसचा ताबा आहे. 2016 मध्ये TRS ने येथील 150 पैकी 99 वॉर्डांमध्ये विजय मिळवला होता. एमआयएमला 44 जागा मिळाल्या. तर भाजपला 4 आणि काँग्रेसला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.

AIMIM ला मागे टाकून भाजप कसे पुढे? 4 कारणेः

1. शहा, योगींसह बड्या भाजप नेत्यांनी केला प्रचार
निवडणूक अगदी गल्ली बोळातली असली तरी या ठिकाणी भाजपने आपल्या राष्ट्रीय ओळख असलेल्या चेहऱ्यांना प्रचारासाठी उतरवले होते. गृह मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी आणि प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या नेत्यांनी रोड शो आणि प्रचार केला. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या सुद्धा येथे तळ ठोकून होते.

2. गल्ली-बोळातल्या निवडणुकीत पाकिस्तान आणि कट्टर राष्ट्रवादाचे मुद्दे
स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकींमध्ये नेहमीच स्थानिक मुद्द्यांवर अर्थात वीज, पाणी आणि रस्त्यांवर चर्चा होते. पण, भाजपने या निवडणुकीत चक्क सर्जिकल स्ट्राइक, कलम 370, इस्लामिकरण, रोहिंग्या, पाकिस्तान, बांग्लादेश आणि हिंदुत्ववादाचे मुद्दे उपस्थित केले. तेजस्वी सूर्याने तर प्रचारात म्हटले होते, की 'अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवैसींनी हैदराबादेत केवळ रोहिंग्या मुस्लिमांच्या विकासावर भर दिला. ओवैसींना दिले जाणारे मत राष्ट्रविरोधी आहे असे ते म्हणाले होते. केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी सुद्धा TRS आणि AIMIM वर घुसखोरांना मदत करण्याचे आरोप केले. याही पलिकडे जाऊन योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणला आणि ध्रुवीकरण होऊन भाजपला त्याचा फायदा झाला.

3. TRS आणि AIMIM मध्ये छुप्या आघाडीचे आरोप
तेजस्वी सूर्या यांनी वारंवार भाजपचा प्रचारात करताना टीआरएस आणि एमआयएमवर अपवित्र आघाडीचे आरोप केले. TRS ने सर्व 150 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. पण, ओवैसींनी फक्त 51 जागांवरच आपले उमेदवार उभे केले होते. तर भाजपने 149 जागा लढवल्या. एमआयएमने सर्व जागा लढवल्या नाहीत त्याचा सुद्धा फायदा भाजपला झाला. स्मृती ईराणी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी एमआयएम आणि टीआरएसच्या छुप्या आघाडीचे आरोप केले.

4. बिगर-मुस्लिम वस्त्यांवरच होते भाजपचे लक्ष
हैदराबादची 40% पेक्षा अधिक लोकसंख्या मुस्लिम आहे. अशात भाजपला आपण मागे राहणार असल्याची भीती होती. त्यातच त्यांनी मुस्लिम वस्त्या सोडून केवळ ज्या ठिकाणी मुस्लिम नाहीत अशा वस्त्यांवर भर दिला. यासाठी पडद्यामागची प्लॅनिंग तेजस्वी सूर्या यांनी केली. त्यांनी 'चेंज हैदराबाद' कॅम्पेन सुरू केले. TRS आणि AIMIM जय श्रीरामच्या घोषणा देण्यात भीतात अशा स्वरुपाचे मुद्दे भाजपकडून मांडण्यात आले. प्रचार सभांमध्ये भाजपने ओवैसींना थेट मोहम्मद अली जिन्ना यांचा अवतार म्हटले.

महापालिका निवडणुकीत भाजपने एवढा जोर का लावला?

 • यासाठी पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. मार्च 2020 मध्ये भाजपने बंदी संजय कुमारांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष केले. भाजपने हैदराबादेतून प्रदेशाध्यक्ष नाही निवडण्याची ही एक दुर्मिळ घटना होती. बंदी संजय कुमार करीमनगर लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते पहिल्यांदाच खासदार बनले.
 • नोव्हेंबरमध्ये दुब्बाक येथे विधानसभा पोटनिवडणूक झाली. येथे TRS ची जागा होती. बंदी संजय कुमार यांनी त्यावेळी घरोघरी जाऊन TRS आणि AIMIM हे कसे एकच आहेत याचा प्रचार करण्यास सुरुवात केली. घरो-घरी जाऊन केलेला हा प्रचार यशस्वी ठरला आणि भाजपचा या जागेवरून विजय झाला. येथून भाजपचे एम रघुनंदन राव यांनी TRS च्या एस सुजाता यांना अवघ्या 1,079 मतांनी पराभूत केले.
 • भाजपसाठी दुब्बाकचा विजय मोठ्या जल्लोषाचा होता. 2018 मध्ये झालेल्या तेलंगणा निवडणुकीत भाजपला 119 पैकी केवळ एकच जागा मिळाली होती. दुब्बाक येथून मिळालेल्या विजयानंतर ही संख्या दोन वर आली होती.

पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी एमआयएम ठरणार महत्वाचा पक्ष?

 • पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सुद्धा भाजप हाच फॉर्मुला वापरू शकते. मुस्लिम बहुल आणि हिंदु बहुल भागांमध्ये प्रचाराचे डावपेच भाजपला पश्चिम बंगालमध्येही फायद्याचे ठरू शकतात. एक प्रकारे हैदराबादची स्थानिक निवडणूक भाजपसाठी एक टेस्ट लॅब ठरली असेही म्हणता येईल.
 • पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये एकूण 294 जागा आहेत. बहुमतासाठी 148 चा आकडा आवश्यक आहे. पश्चिम बंगालमध्ये 30% पेक्षा अधिक लोकसंख्या मुस्लिम आहे. सोबतच, 110 जागा मुस्लिम बहुल आहेत. या ठिकाणी बिहारमध्ये एमआयएमने जसे राजकारण केले तसेच पश्चिम बंगालमध्येही होणार आहे. अर्थात या ठिकाणी सुद्धा मुस्लिम बहुल भागांमध्ये एमआयएम आपले उमेदवार उतरवणार आहे.
 • बिहारमध्ये एमआयएमने 5 जागा जिंकून पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मुस्लिम बहुल भागांत निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. यातून पश्चिम बंगालमध्ये एमआयएम मतदान फोडणारा पक्ष आवश्य बनू शकतो. एमआयएमची पश्चिम बंगालची तयारी सुद्धा जोरात आहे. त्याचा थेट फायदा भाजपला मिळू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप हिंदू मतांचे ध्रुवीकरण करतच आहे. येथे सुद्धा तसे झाल्यास तृणमूल काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात. त्यातच पश्चिम बंगालच्या निवडणुकीत एमआयएमची एंट्री असेल तर ध्रुवीकरण होणार हे जवळपास निश्चित आहे.
 • विशेष म्हणजे, मालदा येथे 51%, मुर्शिदाबादेत 66%, नादियात 30%, बीरभूममध्ये 40%, पुरुलियामध्ये 30% आणि ईस्ट-वेस्ट मिदनापूरमध्ये 15% मुस्लिम लोकसंख्या आहे. या ठिकाणी एमआयएमने आपले उमेदवार उतरवल्यास हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल आणि भाजपची जागा निघण्याची दाट शक्यता राहील.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser