आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पडली होती. या घटनेला 30 वर्षं झाली आहे. यावर AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हा दिवस मी कधीही विसरणार नाही, असे म्हटले आहे. येणार्या पिढ्याही हे विसरणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी म्हटले.
एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ओवेसी म्हणाले की, 6 डिसेंबर हा भारतीय लोकशाहीसाठी नेहमीच काळा दिवस असेल. बाबरी मशिदीची विटंबना आणि विध्वंस हे अन्यायाचे प्रतीक आहे. नाशासाठी जे जबाबदार होते, त्यांना कधीही दोषी ठरवले गेले नाही. आम्ही हे विसरणार नाही आणि येणाऱ्या पिढ्यांच्याही हे लक्षात राहिल याची काळजी घेऊ.
बाबरी मशीद विध्वंसाला आज 30 वर्ष पुर्ण
6 डिसेंबर 1992 रोजी कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केला होता. या घटनेमुळे देशभर दंगल उसळली होती. त्यात 2000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. राम मंदिराच्या ठिकाणी सोळाव्या शतकात बाबरी मशीद बांधण्यात आली होती, असे मत कार सेवकांचे होते.
राम मंदिर-बाबरी मशीद वाद 2019 मध्ये थांबला
अडीच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील बाबरी मशीद आणि राम मंदिराचा वाद संपला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादात 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राम मंदिराच्या उभारणीसाठी 2.77 एकरची वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला देण्याचा निर्णय घेतला.
अयोध्येत हाय अलर्ट, मथुरेत कलम 144 लागू
शिदीच्या विद्ध्वंस प्रकरणाला आता 30 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. मथुरेत कलम 144 लागू करण्यात आले आहे. अखिल भारत हिंदू महासभेने आज मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-इदगाह संकुलात लाडू गोपाळाचा जलाभिषेक आणि हनुमान चालीसा वाचण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.