आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Asaduddin Owaisi Vs Mohan Bhagwat; Asaduddin Owaisi, Mohan Bhagwat, RSS, AIMIM; News And Live Updates

भागवत यांच्यावर ओवैसींचा पलटवार:लिंचिंग करणारे हिंदुत्वविरोधी - सरसंघचालक; हा द्वेष हिंदुत्वाची उपज आहे - AIMIM प्रमुख

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुस्लिम राष्ट्रीय मंचावरून सरसंघचालकांनी हे वक्तव्य केले होते

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदुत्व आणि लिंचिंग विधानावर एआयएमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पलटवार केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, "आरएसएसच्या भागवत यांनी लिंचिंग करणाऱ्यांना हिंदुत्वविरोधी सांगितले. या गुन्हेगारांना गाय आणि म्हैस यातील फरक माहित नसेल. परंतु, हत्या करताना फक्त त्यांना जुनैद, अखलाक, पहलु, रकबर, अलीमुद्दीन ही नावे पुरेशी होती. हा द्वेष हिंदुत्वाची उपज असून यांना हिंदुत्व सरकाराचा पाठिंबा आहे."

काय म्हणाले होते भागवत?
मोहन भागवत लोकांनी संबोधित करताना म्हणाले की, ‘पूजा करण्याच्या पद्धतीच्या आधारावर लोकांमध्ये फरक केला जाऊ शकत नाही.’ त्यांनी जमावाद्वारे मारहाण करून हत्येत (लिंचिंग) सहभागी लोकांवर निशाणा साधला. लिंचिंग करणारे लोक हिंदुत्वविरोधी असल्याचे ते म्हणाले. तथापि, असाही एक काळ होता, जेव्हा काही लोकांविरुद्ध लिंचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.

देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा. मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू असू शकत नाही.’ भागवत रविवारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या ‘हिंदुस्तानी पहले, हिंदुस्तान पहले’ कार्यक्रमाला संबोधित करत होते.

भागवत यांच्या या विधानावर गोंधळ
‘हिंदू-मुस्लिम एकतेला वेगळे वळण लावले जात आहे, पण दोन्ही वेगवेगळे नाहीत, तर एकच आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, भलेही ते कोणत्याही धर्माचे असोत. आपण लोकशाहीत राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे प्रभुत्व राहू शकत नाही, फक्त भारतीयांचे प्रभुत्व असू शकते. डीएनएच्या या विधानावरुन भागवत यांच्या मोठ्या प्रमाणावर टिका केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...