आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Asaduddin Owaisi's Tweet Before The Bhumi Pujan Ceremony In Ayodhya Babri Zinda Hai

बाबरी मशीद जिंदा है:'बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार', अयोध्येतील भूमिपूजनाचा सोहळा सुरू होण्यापूर्वीच असदुद्दीन ओवेसींचे ट्विट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असेल्या लढ्याचा गोड शेवट आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजना सोहळा आज पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत पोहोचले आहे. अवघ्या काही तासांमध्ये हा सोहळा सुरू होणार आहे. मात्र यापूर्वीच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'बाबरी जिंदा है' यासोबतच ओवेसींनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळीच ट्विटवरुन बाबरीचे दोन फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी 'बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार इन्शाअल्लाह', असे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाबरीच्या एका जुन्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. यासोबतच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीची वास्तू पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनामधील फोटोही शेअर केलेला दिसतोय.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन होणा आहे. यावरुन यापूर्वी असदुद्दीन ओवैसी यांनी राम मंदिर भूमिपूजन स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागी होण्यावर आक्षेप घेतला होता. त्यांनी 'हे संविधानाचं उल्लंघन' असल्याचं म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...