आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूस्खलन:बराक व्हॅलीमध्ये मुसळधार पावसानंतर 3 ठिकाणी लँडस्लाइड, 20 जणांचा मृत्यू तर 19 जखमी

सिलचर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील काही भागात पूरस्थिती, रस्ता बंद झाल्याने अनेका गावांचा संपर्क तुटला

दक्षिण असाममधील बराक व्हॅलीमध्ये मुसळधार पावसामुळे करीमगंज, सिल्चर आणि हॅलाकांडीमध्ये लँडस्लाइड झाली. या भीषण दुर्घटनेत 8 मुलांसह 20 जणांचा मृत्यू झाला असून, 19 जण जखमी झाले आहेत. हैलाकांडीत 7 जणांचा मृत्यू. यातील 6 एकाच कुटुंबातील होते. यात 4 मुलांचाही समावेश. दुर्घटना भाटबाजार गावात घडली. सध्या येथे बचावकार्य सुरू आहे. तसेच, आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

असामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफला रेस्क्यू वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

असामच्या काही भागात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे 21 जिल्ह्यातील 9 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद असल्यामुळे, गावांचा संपर्क तुटलाय. या पावसामुळे राज्यात भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. खालील फोटो लँडस्लाइड आल्यानंतरचे आहेत. याबाबत विस्तृत माहिती लवकरच मिळेल...

हैलाकांडीत 4 मुलांसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू.
हैलाकांडीत 4 मुलांसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला.
हैलाकांडीमध्ये भूस्खलनामुळे सर्वात जास्त नुकसान.
हैलाकांडीमध्ये भूस्खलनामुळे सर्वात जास्त नुकसान.
बातम्या आणखी आहेत...