आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य बंगालच्या उपसागरावर सोमवारी (दि.२१) चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून बंगालचा उपसागर व अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळवाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मच्छिमारांना १७ ते २१ मार्चपर्यंत आग्नेय बंगाल उपसागराच्या परिसरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय गृह सचिवांनी अंदमान आणि निकोबार प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरमध्ये एक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे. एक अतिरिक्त टीमही तयार असून गरज पडल्यास त्यांना विमानाने पाठवले जाणार आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आज (दि.१९) एका चांगल्या कमी दाबाच्या क्षेत्रात परावर्तित होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
शनिवारी (दि. १९) सकाळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिणेकडील अंदमान समुद्राला लागून परावर्तित होईल. कमी दाब अंदमान आणि निकोबार बेटांच्या बाजूने आणि जवळ जवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि २० मार्चच्या सकाळपर्यंत तीव्रतेत आणि २१ मार्चला चक्री वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेने या चक्रीवादळाचे नाव असनी असे सूचवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.