आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyclonic Storm Asani LIVE Tracking Updates; Andhra Pradesh Alert | Visakhapatnam, Odisha, Bay Of Bengal Heavy Rain Alert Latest News

असनी चक्रीवादळ:बंगालच्या उपसागरात पोहोचल्यानंतर कमकुवत होईल वादळ, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

विशाखापट्टणम/भुवनेश्वर/कोलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले असनी चक्रीवादळ आता कमकुवत होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळ गुरुवारी हळूहळू बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचेल. त्यानंतर ते शांत होऊ शकते.

बंगालच्या उपसागरात पोहोचत असताना, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हलक्या आणि मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग ताशी 80 किमी आहे. या राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या इतर राज्यांवरही वादळाचा परिणाम होणार आहे. बंगाल आणि ओडिशा लगतच्या झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. बुधवारीही या भागात पाऊस झाला होता.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी असनी चक्रीवादळ मछलीपट्टणमपासून सुमारे 20 किमी उत्तर-पूर्व, नरसापूरपासून 50 किमी नैऋत्य आणि आंध्र प्रदेशातील काकीनाडापासून 120 किमी पश्चिम-नैऋत्येस होते. पावसाबाबत राज्यात अजूनही अलर्ट देण्यात आला आहे.

अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, किनारी ओडिशा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केरळ आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी किनारी जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांना आपत्कालीन परिस्थितीत हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यावर आमचे लक्ष असायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आंध्र सरकारने वादळाचा फटका बसलेल्या 7 जिल्ह्यांमध्ये 454 मदत शिबिरे उघडली आहेत.

चक्रीवादळामुळे कोलकात्यात मुसळधार पाऊस झाला. आज आणि उद्याही येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे कोलकात्यात मुसळधार पाऊस झाला. आज आणि उद्याही येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिणेकडील राज्यांच्या किनारपट्टीवर वादळाचा इशारा दिल्याने हजारो बोटी अडकल्या

केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये वादळामुळे मच्छिमारांचे जीवन संकटात सापडले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार मच्छिमारांना पुढील आदेश मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. तिरुअनंतपुरममधील विजनीजम बंदरात मच्छिमार त्यांच्या बोटी किनाऱ्यावर ठेवून हवामान सुधारण्याची वाट पाहत आहेत.

एनडीआरएफच्या 50 तुकड्या तैनात, नौदलही सतर्क

असनीमुळे NDRF च्या एकूण 50 टीम पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशसाठी मध्ये पाठवण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यांमध्ये NDRF ला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय विशाखापट्टणममधील आयएनएस देगा आणि चेन्नईजवळील आयएनएस रझाली या नौदल क्षेत्रात हवाई सर्वेक्षण आणि गरज भासल्यास बाधित भागात मदत कार्यासाठी अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...