आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामला कोरोना:बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसारामला कोरोनाची लागण, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

जोधपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी आसारामला आजीवन कारावासाची शिक्षा झाली आहे

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणा आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री ताप आल्याने आणि ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्यानंतर त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आसारामला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाहोता. आसारामला रुग्णालयात घेऊन गेल्याची माहिती मिळताच त्याचे अनेक समर्थन तिथे दाखलझाले. पण, पोलिसांनी कोणालाच रुग्णालयात जाऊ दिले नाही. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना आसाराम खूप थकलेला आणि त्याचे वजनही खूप कमी झालेले दिसत होते.

बातम्या आणखी आहेत...