आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Asaram Gets Life Imprisonment In Another Torture Case; Asaram Has Been In Jail For 10 Years For His Heinous Act, The Court Said

आणखी एका अत्याचार प्रकरणात आसारामला जन्मठेप:कोर्ट म्हणाले, त्याचे कृत्य घृणास्पद, 10 वर्षांपासून तुरुंगात आहे आसाराम

गांधीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2013 मध्ये सुरतमध्ये गुन्हा दाखल

अत्याचारप्रकरणी आधीच जन्मठेप भोगत असलेल्या आसारामला गांधीनगर कोर्टाने आणखी एका शिष्येवरील अत्याचारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

न्यायाधीश डी.के.सोनी म्हणाले, पीडिता त्याच्या मुलीपेक्षा कमी वयाची होती. गुन्हेगाराचे कृत्य समाजाच्या नजरेत अत्यंत घृणास्पद आहे. त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे. आपल्याला गोवले जात असल्याचा आसारामाने दावा केला. दुसरीकडे, सरकारी वकील म्हणाले, तो ‘सराईत गुन्हेगार’ आहे. त्याला मोठ्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा दिली द्यावी. दरम्यान, सबळ पुराव्याअभावी कोर्टाने आसारामची पत्नी, मुलीसह इतर ६ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकालाचा अभ्यास केल्यानंतर शिक्षेला आव्हान दिले जाईल, असे आसारामचे वकील म्हणाले.

सुरतच्या महिलेचा आरोप
२०१३ मध्ये सुरतच्या महिलेने केलेल्या आरोपांनुसार, सन २००१ ते २००६ या दरम्यान आसारामने मोटेराच्या आश्रमात बोलावून आपल्यावर वारंवार अत्याचार केले. तिने सुरुवातीला ८ आरोप केले होते. २०१४ मध्ये आसाराम आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले. २०१६ मध्ये आरोप निश्चिती झाली. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...