आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:मंत्री 'तू-तू -मै-मै' करत बसलेय, 'पाडून दाखवा सरकारचे' हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. अशात रेल्वेगाड्या बंद आहेत. दरम्यान भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडल्या नाहीत. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?' असा टोला त्यांनी राज्य सरकारला लावला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, 'कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल या राज्यातील "पाडून दाखवा सरकारकडे आहे. कोकणातरेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरू आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला' असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले की, 'आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले.. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत. "पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?' असं देखील शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलारांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रश्न लावून धरला आहे. यावरुन ते वारंवार सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान आजही त्यांनी वेगळ्या शैलीत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

बातम्या आणखी आहेत...