आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ashok Gehlot Coronavirus Update; Rajasthan News | CM Gehlot Tested Positive For Covid 19 And Isolated Himself

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानात कोरोना:लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण; लस घेतल्याने लक्षणे नाहीत

जयपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही रुग्णाला धोका कमी असतो, लवकर बरे होण्याची शक्यताही अधिक

राजस्थानमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची भर पडली आहे. अशोक गहलोत यांनी गुरुवारी सोशल मीडियावरून यासंदर्भातील माहिती जारी केली. त्यांनी लिहिले, की "कोरोनाची टेस्ट केली असता माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. मी पूर्णपणे ठीक आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करताना मी स्वतःला आयसोलेट केले असून असेच काम सुरू ठेवणार आहे." उल्लेखनीय बाब म्हणजे, गहलोत यांच्या पत्नी सुनिता गहलोत यांचा रिपोर्ट एका दिवसापूर्वीच पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टेस्ट करून घेतली.

गहलोत यांनी घेतले व्हॅक्सीनचे दोन्ही डोस
विशेष म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस आधीच घेतले आहेत. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात लसीचा पहिला डोस आणि मार्च महिन्यात दुसरा डोस घेतला होता. कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना संक्रमण होणारच नाही याची शाश्वती नाही. पण, निश्चितच अशा व्यक्तींना कोरोना झाल्यास धोका कमी असतो आणि बरे होण्याची क्षमता देखील वाढते असे तज्ञ्जांचे म्हणणे आहे. त्यामुळेच, गहलोत यांना कोरोना झाल्यानंतरही गंभीर लक्षणे नाहीत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला कोरोना
तत्पूर्वी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र तसेच खासदार दुष्यंत सिंह यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांचा रिपोर्ट बुधवारीच पॉझिटिव्ह आला. तर जयपूरचे आमदार अशोक लाहोटी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. राजस्थानात गेल्या 24 तासांत 16,613 नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर 20 जणांच्या मृत्यूची अधिकृत नोंद झाली आहे. पण, अनौपचारिक आकड्यानुसार मृतांची संख्या 120 आहे. गेल्या 24 तासांत राजस्थानमध्ये 8,303 कोरोना रुग्ण बरे सुद्धा झाले आहेत.

राजस्थानात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत राज्यामध्ये मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यांचा रिपोर्ट पाहिल्यास मृत्यूचे प्रमाण 3 पटीने वाढल्याचे दिसून आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ RTPCR चाचणी करून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्यांचे नाव सरकारी रिपोर्टमध्ये सामिल केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...