आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बलात्कारी व गँगस्टर्सप्रकरणी मोठे विधान केले आहे. ते गुरुवारी उदयपूरमध्ये बोलताना म्हणाले - माझे चालले तर मी बलात्कारी व गुंडांचे केस कापून त्यांची भर बाजारातून धिंड काढेल. त्यांना लाज वाटली तर दुसरे लोक असे करण्यास धजावणार नाहीत.
अशोक गेहलोत राजस्थानातील वाढत्या टोळीयुद्धाच्या मुद्यावर बोलत होते. गुरुवारी अलवारमध्ये दोन गटात गोळीबार झाला. त्यात एका निष्पाप महिलेला गोळी लागली. गेहलोत यांनी या गँगस्टर्सवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत.
पेपर लीक प्रकरणावर केले भाष्य
भरती परीक्षेचा पेपर लीक झाल्याप्रकरणी गेहलोत म्हणाले - पेपर लीक झाल्यास सरकार त्यावर कारवाई करते. ज्या सेंटरवर पेपर होतो. त्या शालेची मान्यता रद्द केली जाते. त्यात सहभागी सरकारी कार्मचारी-अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाते. तत्काळ कारवाई केली जाते.
अग्निवीर योजना व शेतकऱ्यांशी संबंधित योजना विना चर्चा पारित
गेहलोत म्हणाले - केंद्राची अग्निवीर योजना व शेतकऱ्यांच्या मुद्यावर संसदेत विनाचर्चा निर्णय घेण्यात आले. अचानक घोषणा करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करणाऱ्यांना खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली. धमकावून शांत करणे योग्य नाही. कृषी कायदे लागू करण्यापूर्वी फीडबॅक घेतला असता तर चांगले झाले असते. शेतकरी आंदोलनात 600 जण मारले गेले नसते.
उत्तर प्रदेशातही पेपर लीक
मुख्यमंत्री म्हणाले - उत्तर प्रदेश, गुजरात व बिहारमध्येही पेपर लीक झाले. पण तिथे कोणतीही कारवाई झाली नाही. आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पेपर लीक कसा व का झाला याचा शोध घेतला. न्यायालयातील भरती व आर्मीचेही पेपर लीक झाले. संपूर्ण देशात अशा प्रकारची टोळी सक्रीय आहे.
डोटासरांनी श्रम बोर्डाच्या उपाध्यक्षांचा मुद्दा उपस्थित केला
उदयपूरच्या रेल्वे ट्रेनिंग ग्राउंवर झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गेहलोत यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा, मंत्री अशोक चांदना यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. डोटासरा यांचे भाषण सुरू असताना श्रम बोर्डाचे उपाध्यक्ष जगदीश राज श्रीमाली, डोटासरा यांच्या जागेवर गेहलोत यांच्याजवळ जाऊन बसले.
हे पाहताच डोटासरा यांनी भाषण थांबवले. त्यांनी श्रीमाली यांना स्वतःच्या जागेवर जाऊन बसण्याचा इशारा केला. त्यावर श्रीमाली यांचे चेहरा पडला. ते तत्काळ आपल्या जागेवर जाऊन बसले. या प्रसंगाची उपस्थितांत खमंग चर्चा रंगली होती. श्रीमाली यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.