आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकार कांदे-बटाट्यामुळे कोसळले नाही:ट्रक भरून पैसे BJP च्या कार्यालयात पोहोचले, गहलोत यांचा खळबळजनक आरोप

जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजप व निमलष्करी दलांवर गंभीर आरोप केलेत. 'महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व कर्नाटकातील सरकार कांद्या बटाट्यामुळे कोसळले नाही. यासाठी निमलष्करी दल व पोलिसांच्या ट्रकांमधून 2 नंबरचा पैसा भाजपच्या कार्यालयांत पोहोचवण्यात आला,' असे ते म्हणालेत.

गहलोत म्हणाले - 'हे काय करतात, तुम्हाला ठावूक आहे? हे आपली सरकारे असलेल्या राज्यांतील निमलष्करी दल किंवा पोलिसवाल्यांना हाताशी धरतात. त्यांचे ट्रक भरून हा पैसा भाजप कार्यालयात मागच्या दाराने पोहोचवतात. गाडी पोलिसांची असल्यामुळे तिला कुणीही पकडत नाही? लोकांना वाटते या गाड्या त्यांच्या मदतीला आल्या आहेत.'

'हे एक खूप मोठे षडयंत्र आहे. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सत्य तुमच्यासोबत आहे,' असे ते म्हणाले. गहलोत जयपूरमध्ये सोमवारी शहीद स्मारकाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

गहलोत म्हणाले -'गोवा, अरुणाचल, कर्नाटक, मध्य प्रदेश व आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कांद्या-बटाट्याने पडले नाही. तुम्हीच सांगा, मोदींनी नोटाबंदी केली. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, 1000-500 च्या नोटा बंद करण्यात आल्या. या नोटांची जागा मोठ्या नोटांनी घेतली. कमी वेळेत अधिकाधिक पैसा इतरत्र पोहोचवण्यात यावा यासाठी 2 हजाराची नोट काढण्यात आली.'

गुजरात मॉडल फ्लॉप होते, संपूर्ण देशाला धोका दिला

गहलोत म्हणाले -'मोदींचे गुजरात मॉडल फ्लॉप होते. या मॉडेलच्या नावाने संपूर्ण देशाची फसवणूक करण्यात आली. अडवाणींनी सुरूवात केली. मोदी त्यांच्या मदतीने दिल्लीत पोहोचले.'

ते म्हणाले -'हे मॉडेल दुसरे तिसरे काही नाही केवळ मार्केटिंग होती. भाजपचे लोक आजही या मार्केटिंगवर हजारो कोटींचा चुराडा करत आहेत. आज आयटी व सोशल मीडियाचा जमाना आहे. भाजप यावर अमाप पैसा खर्च करत आहे.'

RSS ने लिहून दिले होते -भविष्यात राजकारण करणार नाही

गहलोत यांनी अन्य एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्ला चढवला. ते म्हणाले -'मला आजही बालपणीचे दिवस आठवतात. तेव्हा हिंदी-इंग्रजीच्या मुद्यावरुन आंदोलन होत होते. आमचा इंग्रजीला विरोधत होता. तामिळनाडू व दक्षिण भारताचे लोक हिंदी विरोधात होते. यावरून खूप दंगली झाल्या. संघ हिंदू राष्ट्राची भाषा करतो.'

'हिंदू राष्ट्र अस्तित्वात येईल तेव्हा समाजात दरी निर्माण होईल. संघ भेदभाव नष्ट करण्याचे काम का करत नाही? 100 वर्षांचा इतिहास असणाऱ्या संघावर सरदार वल्लभभाई यांनी बंदी घातली होती. तेव्हा त्यांनी भविष्यात राजकारण करणार नसल्याचे लिहून दिले होते. पण आज ते काय करत आहेत? आज भाजपच्या मदतीने काय करत आहेत,' असेही गहलोत यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...