आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ashok Gehlot Sachin Pilot Face to Face Pilot Traitor, Shresthi Can't Make CM: Gehlot

अशोक गेहलोत-सचिन पायलट समोरासमोर:पायलट गद्दार, श्रेष्ठी सीएम बनवू शकत नाही : गेहलोत

जयपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, ‘पायलट देशद्रोही आहेत. दोन वर्षांपूर्वी सरकार पाडण्यासाठी १०-१० कोटी घेतल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. ज्याच्याकडे १० आमदारही नाहीत, ज्याने बंडखोरी केली, अशा व्यक्तीला पक्ष श्रेष्ठी मुख्यमंत्री बनवू शकत नाही. पायलट यांनी पलटवार करत म्हटले, ‘गेहलोतांनी मला यापूर्वीही नालायक व देशद्रोही म्हटले आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाचा दोनदा पराभव झाला आहे.

सकाळी पायलट राहुल गांधींसाेबत पदयात्रेत
गुरुवारी मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेत पायलट राहुल गांधींसोबत दिसले. राजस्थानच्या राजकीय उलथापालथीवर पायलट म्हणाले होते, जो काही निर्णय घ्यावा लागेल तो पक्ष घेईल. काही तासांनंतर, गेहलोत यांची दोन दिवसांपूर्वी घेतलेली मुलाखत प्रसारित झाली.

संध्याकाळी काँग्रेस म्हणाली, मतभेद दूर करू
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, गेहलोत हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. दोघांतील मतभेद दूर होतील. दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड म्हणाले की, राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी गेहलोत यांनी पायलट यांना गद्दार म्हणून काँग्रेस तोडो यात्रेची सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...