आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ashwini Vaishnaw New Railway Minister Orders Officials To Work In Two Shifts In Minister Office; News And Live Updates

नवीन रेल्वेमंत्र्यांचा मोठा निर्णय:मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत मोठे बदल, दोन शिफ्टमध्ये करावे लागेल काम; रेल्वेची कमाई वाढवण्यावर भर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खाजगी रेल्वे कर्मचाऱ्यांना हे नियम लागू नसेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या विस्तारामध्ये अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच रेल्वेमंत्री वैष्णव यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजात बदल करत कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा आदेश दिला आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, कर्मचाऱ्यांची पहिली शिप्ट ही सकाळी 7 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत असेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. यावितिरिक्त वैष्णव यांनी रेल्वेची कमाई कशी वाढवली जाईल यावर विचार विनिमय सुरु केला आहे. नवीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे 94 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

खाजगी रेल्वे कर्मचाऱ्यांना हे नियम लागू नसेल
रेल्वे मंत्रालयाचा हा नवीन आदेश केवळ एमआर सेल (मंत्री कार्यालय) यांनाच लागू असणार आहे. हा आदेश कोणत्याही खाजगी रेल्वे कर्मचाऱ्यांना लागू नसेल असे रेल्वे मंत्रालयाचे ADG PR डीजे नारायण यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांनी तात्काळ या नियमांचे पालन करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

वैष्णव यांच्याकडे आयटी मंत्रालयाची जबाबदारी
ओडिशा येथील राज्यसभा सदस्य अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयासोबत आयटी मंत्रालयाची जबाबदारीदेखील स्विकारली आहे. त्यांनी माजी आयटीमंत्री रविशंकर प्रसाद यांचे स्थान घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...