आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Asia's 460 foot Tricolor To Be Flown At Attari Border, 100 foot Flag Hoisted At Gulmarg

झंडा ऊंचा रहे हमारा:अटारी सीमेवर फडकणार आशियातील उंच 460 फुटांचा तिरंगा, गुलमर्ग येथे लावला जातोय 100 फुटांचा ध्वज

अमृतसर / शिवराज द्रुपद्र2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानलगतच्या अटारी सीमेवर देशाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला जाईल

पाकिस्तानलगतच्या अटारी सीमेवर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाची सीमेच्या आणखी २०० मीटर जवळ उभारणी केली जाणार आहे. तसेच तिरंग्याची उंची १०० फूट वाढवण्यासाठीचा प्रस्तावही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे गॅलरीत बसून बीएसएफचा बीटिंग द रिट्रीट समारंभ बघणाऱ्या पाकिस्तानच्या प्रेक्षकांनाही त्याचे दर्शन होऊ शकेल. सध्या ध्वजाचे स्थलांतर करण्यासाठी नव्या जागेवर वर्तुळाकार प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे.

कोराेनाकाळामुळे सध्या अटारी सीमेवर रिट्रीट बघण्यासाठी सर्वसामान्य लोकांना सुमारे १७ महिन्यांपासून बंदी आहे. येथे रोज ३० ते ४० हजार पर्यटक येत असतात आणि त्यांना बसण्यासाठी गॅलरी अपुरी पडते. झीरो लाइनपासून थोड्याच अंतरावरील सुवर्णजयंती दारासमोर तिरंगा उभारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वर्तुळाकार प्लॅटफॉर्म बनवला आहे. तेथे तिरंगा उभारला जाणार आहे. इकडे, स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैन्याच्या प्रयत्नांनी गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की- रिसॉर्टमध्ये १०० फूट उंच राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे.

पाकिस्तानचा झेंडा भारताच्या तिरंग्यापेक्षा जास्त उंच असल्याने उंची वाढवण्याची गरज
गॅलरीत बसणाऱ्यांना ध्वज दिसत नाही. याउलट पाकिस्तानचा ४०० फूट उंच झेंडा दिसतो. याबाबत प्रेक्षकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बीएसएफच्या सूचनेवरून शिफ्टिंग तसेच उंची वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. प्राधिकरणाच्या अधिकृत सूत्रांनुसार ध्वजाची जागा बदलल्याने उंचीही १०० फूट वाढवली जाईल. म्हणजे ४६० फुटांचा आशियातील सर्वात उंच ध्वज होईल.

झीरो लाइनपासून २०० मीटर अंतरावर तिरंगा....
मार्च २०१७ मध्ये देशातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज उभारण्यात आला होता. खांब्याची उंची ३७० फूट, वजन ५५ टन आहे, तर तिरंग्याची लांबी १२० तर रुंदी ८० फूट होती.

लोकांसाठी सेल्फी पॉइंट
ज्या ठिकाणी ध्वज उभारला जाणार आहे तेथे रस्त्याच्या कडेला मोठी एलईडी लावली जाईल म्हणजे ज्यांना गॅलरीत जाता आले नाही त्यांना तेथूनच रिट्रीट बघता येईल. याच ठिकाणी सेल्फी पॉइंटही बनवला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...