आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीवरील स्वर्ग:आशियातील सर्वात मोठे असलेले श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन 20 मार्चपासून खुले होणार, 15 लाख फुलांचे दर्शन

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मीर खोऱ्यात वसंताचे आगमन झाल्याने विविध फुलेही बहरू लागली आहेत. हिमालयाच्या शिखरांवर रंगीबेरंगी फुलांचे ट्युलिप उद्यानातही ताटवे आकर्षित करू लागले आहेत. आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन २० मार्चपासून खुले होणार आहे. या उद्यानात सुमारे १५ लाख ट्युलिपची फुले पाहता येतील. शेख फय्याज अहमद, उद्यानाच्या आयुक्तानुसार गेल्या वर्षी २.२५ लाख पर्यटकांनी येथे भेट दिली होती. यंदा ही संख्या जास्त असेल, असे उद्यानाच्या प्रशासनाने सांगितले.

30 एकरभर उद्यान क्षेत्र,
५५ प्रजाती

श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन
३० दल सरोवराचा परिसर व जबरवनच्या तळाशी ट्युलिप उद्यानाचे ३० एकर क्षेत्र दिसते. उद्यानात ट्युलिपच्या ५५ पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. सोनमार्गमध्ये १२.५ एकरमध्ये आणखी एक ट्युलिप उद्यान साकारले जात आहे

बातम्या आणखी आहेत...