आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Fit India Dialogue 2020 Live Updates: Modi Speaks Milind Soman, Virat Kohli

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिट इंडिया मूव्हमेंटचे एक वर्ष:मोदींनी विराटला योयो टेस्टविषयी केली विचारणा, कोहली म्हणाला - फिटनेससाठी हे आवश्यक, मी देखील यामध्ये फेल झालो तर सिलेक्शन नाही होणार

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिलिंद सोमण म्हणाले - लोक विचारतात की, 55 व्या वर्षी एवढे कसा धावता?

फिट इंडिया मूव्हमेंटला एक वर्ष पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रीडापटू आणि इतर सेलिब्रिटींशी बातचित करत आहेत. क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतच्या चर्चेत मोदींनी विचारले की, योयो टेस्ट संघासाठी घेण्यात येत आहे, कर्णधारला देखील हे करावे लागेल का? यावर कोहली म्हणाला की आम्ही आमची फिटनेसट लेव्हल वाढवू इच्छितो, यासाठी योयो चाचणी आवश्यक आहे. जर मी यात फेल झालो तर सिलेक्शन होऊ शकणार नाही.

मोदींची विराटसोबत बातचित
मोदी- दुबईमधून वेळ काढून जोडले गेलात. तुमचे तर नाव विराट आहे. फिटनेसवर काय सांगाल?
विराट - मी देखील आयुष्यात ट्रांजिशनमधून गेलो. मला अनुभव आला की, रुटीन योग्य नव्हता, कारण खेळ खूप पुढे गेला होता. ही सेल्फ रियलाजेशनची गोष्ट होती. मलाही वाटले की, फिटनेस प्रायोरिटी असायला हवा. प्रॅक्सिस मिस झाली तर वाईट वाटत नाही. मात्र फिटनेस सेशन मिस झाला तर खूप वाईट वाटते.

मोदी - दिल्लीचे छोले-भटूरे मिस करता काय?
विराट - मी जिथून आलो तेथील जेवणामुळे फारसा परिणाम होत नाही. आता तंदुरुस्तीसाठी बरेच काही बदलावे लागले. जर आपण तंदुरुस्तीमध्ये सुधारणा केली नाही तर आम्ही गेममध्ये मागे राहू. शरीर आणि मन दोघेही निरोगी असणे महत्वाचे आहे. रात्री गोड खाऊन कोणतीही अॅक्टिव्हिटी न करता झोपून गेलो, हे चुकीचे असते. आपल्या मनात स्पष्ट असणे महत्वाचे आहे, आपण कोणासाठी फिट होऊ इच्छिता?

मिलिंद सोमण म्हणाले - लोक विचारतात की, 55 व्या वर्षी एवढे कसा धावता?
कोहलीपूर्वी मोदींनी अॅक्टर मिलिंद सोमणसोबत बातचित केली. या संभाषणात त्यांनी त्यांचे गाणे 'मेड इन इंडिया'या उल्लेख केला. पंतप्रधानांनी सोमण यांना वयाविषयी विचारले. अॅक्टरने म्हटले 'लोक मला म्हणतात की, वयाच्या 55 व्या वर्षी एवढे कसे धावता? मी त्यांना म्हणतो की, माझी आई 81 वर्षांची आहे. ती देखील हे सर्व करते. माझे आजोबा खूप फिट होते. बसल्याने तुम्ही कमजोर होता. कोणतीही व्यक्ती एक्सरसाइजने 3 किमी ते 100 किमी धावू शकते'

सोमणे म्हटले, 'मला एक्सरसाइज करणे आवडते. जो वेळ मला मिळतो, त्यामध्ये मी एक्सरसाइज करत राहतो. जिममध्ये जात नाही, मशीनचा वापर करत नाही. मी 10 फुटांच्या खोलीतही फिट राहू शकतो. मी धावतो तेव्हा मी शूजही घालत नाही. तुमच्याकडे जे आहे त्यातही तुम्ही फिट राहू शकता.'

'तुम्ही स्वतःची एक्सरसाइज बनवू शकता. फिट राहायचे आहे हे लोकांना समजणे आवश्यक आहे. तुम्ही कशासाठी फिट राहू इच्छिता हे जाणून घेणे आवश्यक आहे. जसे - पर्वतारोहण, खेळण्यासाठी किंवा सामान्य जीवनासाठी.40, 50, 60 च्या वयात आयुष्य संपत नाही. तुम्ही नव्या आयुष्याची सुरुवात करता.'

रुजुता दिवेकरसोबत केलेल्या बातचितमध्ये मोदींनी हेल्दी फूडविषयी सांगितले. रुजुताने म्हटले की, आजकल अमेरिकेतही घी शब्द सर्वात जास्त गूगल केला जात आहे. मोदी म्हणाले की, मी सहजन (मुनगा किंवा ड्रमस्टिक)चे पराठे खातो. आठवड्यातून दोन वेळा आईशी बोलणे होते. ती एकच विचारते - हळद घेत आहेस ना.

स्वामी शिवध्यानम स्वामीसोबत बातचित
स्वामी जी - गुरुकुलमध्ये लहान वयाचे मुले येऊन राहत होते, तेथे घरासारखे वातावरण होते. आमच्या आश्रममध्येही हीच पध्दती आहे. योग केवळ अभ्यास नाही, जीवन जगण्याची कला आहे. आश्रम असे वातावरण देते, जे योगाची शिक्षण आयुष्यात उतरु शकेल.. आश्रमात सर्व लोक स्वतःचे काम स्वतः करतात. मुले-मुली येतात, त्यांनी पहिले कोणतेही काम केलेले नसते. जाताना म्हणतात की, आमचे जीवन बदलले आहे.

बातम्या आणखी आहेत...