आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assam And West Bengal Oth Taking Ceremony Live Update | Himanta Biswa Sarma, Mamata Banerjee, Assam New Chief Minister, West Bengal CM

नवीन सरकारचा शपथविधी:हिमंत बिस्वा सरमा यांनी घेतली असामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ; तर पश्चिम बंगालमध्ये पार पडला ममतांच्या 43 मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा

गुवाहाटी/कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने आणि असाममध्ये भाजपमे मोठा विजय मिळवला आहे

असाममध्ये विधानसभा निकालाच्या एका आठवड्यानंतर हिमंत बिस्वा सरमा यांनी आज(दि.10)राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल जगदीश मुखी यांनी गोपनीयतेची शपथ दिली. श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्रमध्ये या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. रविवारी सर्वानुमते भाजप आणि NDA नेतेपदी निवड झाल्यानंतर हिमंत विस्वा सरम यांचा असामचे 15वे मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

तिकडे, पश्चिम बंगालमध्येही आज बंगाल सरकारमधील 43 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राजभवनात कोविड नियमांचे पालन करुन सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार, राज्य मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली. डॉ. अमित मित्र आणि ब्रात्य बसुसह 3 मंत्र्यांनी व्हर्चुअल शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील उपस्थित होत्या.

ममताांनी 5 मे रोजी शपध घेतली
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसने 213 जागांवर मोठा विजय मिळवला. तर, भाजपच्या वाट्याला 77 जागा आल्या. यानंतर तृणमूल चीफ ममता बॅनर्जींनी 5 मे रोजी तिसऱ्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

या कारणामुळे असामच्या नेतृत्वात बदल

बिस्वा संपूर्ण नॉर्थ-ईस्टमधील प्रभावी नेते आहेत. सोनोवाल सरकारमध्ये त्यांच्याकडे फायनंस, प्लानिंग अँड डेव्हलपमेंट, हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, एजुकेशन आणि PWD सारख्या महत्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात आली होती. केंद्रीय नेतृत्वातील नेत्यांसोबत त्यांचे चांगली संबंध आहेत. बिस्वा 2015 मध्ये काँग्रेसमधून भाजपात सामील झाले होते. नॉर्थ-ईस्टमध्ये भाजपच्या विस्तारात बिस्वा यांची महत्वाची भूमिरा राहिली आहे. बिस्वा नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायंसचे संयोजक आहेत. या वर्षी या अलायंसची स्थापना स्थानिक पक्ष-संघटनांना भाजपसोबत आणण्यासाठी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...