आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडिलांची अटक टाळण्यासाठी एका अल्पवयीन तरुणीने आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना आसाममध्ये घडली आहे. विशेष म्हणजे या तरुणीचे वडील तिचा बालविवाह लावून देत होते. यामुळे पोलिस तिच्या वडिलांना अटक करण्याच्या प्रयत्नांत होते.
आसाम सरकारने बालविवाहाविरोधात धडक मोहीम राबवली आहे. राज्यात आतापर्यंत या प्रकरणी 2170 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात आता एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सीमा खातून उर्फ खुशबू नामक ही तरुणी अल्पवयीन होती. तिचे लग्न लावून देण्यात येत होते. बालविवाह करण्याप्रकरणी वडिलांना अटक होऊ नये, यासाठी शुक्रवारी रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
2 वर्षांपूर्वी कोरोनामुळे पतीचा मृत्यू, पदरात 2 मुले
साउथ सालरमा-मंकाचर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सीमा खातूनच्या पतीचे 2 वर्षांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर ती पोटच्या 2 मुलांसह वडिलांच्या घरी राहत होती. आसामचे मुख्यंमत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी बालविवाहाप्रकरणी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सीमा खातून यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
राज्यात आतापर्यंत 2,170 अटक, 4,074 गुन्हे
आसाम पोलिसांचे प्रवक्ते व IG (कायदा सुव्यवस्था) प्रसन्नता कुमार भुयान यांनी सांगितले की, बालविवाहात सहभाग असणाऱ्या 2170 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यात 52 पुजारी व काझींचा समावेश आहे.
हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आसाम पोलिसांचे डीजीपी जी पी सिंह यांनी सांगितले की, राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत बालविवाहाशी संबंधित 4074 गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी सर्वाधिक अटक धुबरी, बरपेटा, कोकराझार व विश्वनाथ जिल्ह्यात झाल्या आहेत.
एका रिपोर्टनंतर सरकार कठोर
बालविवाहाच्या मुद्यावर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणाचा एक रिपोर्ट समोर आला होता. त्यात आसाममध्ये माता-बाल मृत्यूदर सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले होते. याचे सर्वात मोठे कारण बालविवाह होते. या रिपोर्टनुसार, बालविवाहाचे सर्वाधिक 370 गुन्हे आसामच्या धुबरी जिल्ह्यात नोंदवण्यात आले. तर होजईत 255, उदलगुरीत 235, मोरीगावमध्ये 224 व कोकराझारमध्ये 204 गुन्हे नोंदवण्यात आलेत. दीमा हसाओत 24, कछारमध्ये 35, तर हैलाकांडीमध्ये बालविवाहाचा केवळ एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालविवाहात मुलगी प्रेग्नेंट झाली, तर पतीवर POCSO कारवाई
हा अहवाल उजेडात आल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत बालविवाहाच्या प्रकरणांत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्वांवरच अटकेची कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी एका ट्विटद्वारे सांगितले की, राज्यात बालविवाहाचे 4004 गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी लवकरच कारवाई केली जाईल. बालविवाह केल्यानंतर मुलगी गरोदर राहिली, तर तिच्या पतीवर पॉक्सो अंतर्गत कारवाई केली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.