आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसामच्या दारंग जिल्ह्यात गुरुवारी ताबा हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा अतिक्रमण करणाऱ्यांशी मोठा संघर्ष झाला. मीडिया रिपोर्टनुसार, सिपाझरमध्ये झालेल्या या चकमकीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमीही आहेत. या चकमकीचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यात मोठ्या संख्येने पोलिस हजर दिसत आहे.
असे सांगितले जात आहे की, पहिले लोकांनी दगडफेक सुरू केली. यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली. काही पोलिसही गोळ्या झाडताना दिसत आहेत. एक माणूस काठी घेऊन पोलिसांच्या दिशेने जातो. यानंतर अनेक पोलिस त्याच्यावर कारवाई करतात. सोमवारपासून येथे तणावाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे नऊ जवानही जखमी झाले आहेत.
दारंग जिल्ह्याचे एसपी सुशांत बिस्वा सरमा म्हणाले की, प्रशासकीय कारवाईचा निषेध करताना अतिक्रमणधारकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये 9 पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेत दोन गावकरी देखील जखमी झाले आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. असे सांगितले जात आहे की एसपी सुशांत बिस्वा सरमा हे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे सख्खे भाऊ आहेत.
अतिक्रमण का काढले जात आहे?
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी येथून अवैध धंदे हटवण्याचे निर्देश दिले होते. ही जमीन कृषी प्रकल्पांसाठी वापरली जाईल असे सरकारचे म्हणणे आहे. त्याचवेळी, स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे की, गावाची 120 बिघा जमीन रिकामी करण्यात आली होती, जी कथितपणे प्राचीन शिव मंदिराशी जोडलेली होती. मुख्यतः पूर्व बंगालचे मुसलमान या गावात राहतात.
अतिक्रमण करणाऱ्यांवर शासनाचा बुलडोझर
आसाम सरकार जूनपासून, म्हणजे नवीन सरकार स्थापनेनंतर, बेकायदेशीर जमीन अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवत आहे. 20 सप्टेंबर रोजी, या अंतर्गत, दारंग जिल्ह्यातील सिपाझारमधील प्रशासनाने सुमारे 4,500 बिघा जमिनीचा ताबा काढून घेतल्याचा दावा केला. येथे 800 कुटुंबांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला होता. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
गुरुवारी प्रशासनाने पुन्हा एकदा सुमारे 200 कुटुंबांच्या विरोधात ही मोहीम सुरू केली. अतिक्रमणधारकांनी या कारवाईला कडाडून विरोध करत लाठ्या -काठ्यांनी सशस्त्र पोलिसांवर हल्ला केला. यानंतरच गोळीबाराची घटना घडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.